Maharashtra Politics : CM फडणवीस - शिंदेंमध्ये शीतयुद्ध? या 5 कारणांमुळे महायुतीत फुट पडल्याची चर्चा

CM Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरील महत्त्वाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिने झाले आहेत. मात्र महायुतीत धुसफुस गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे महायुतीत फुट पडली का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यासाठी काही घटना देखील निमित्त ठरत आहेत. 

राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विजयी होऊन जेमतेम तीन महिने उलटले असताताना त्यांच्यातील अंतर्गत कलह दिसून येत आहेत. सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावरुन महायुतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अलिकडेच, स्पेशल प्रोटेक्शन युनिट (SPU) ने प्रमुख राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांच्या धोक्याच्या आकलनाच्या आधारे त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ज्यानंतर काही नेत्यांची, विशेषतः शिंदे यांच्या गटातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकारमधील बदलांमुळे काही राजकीय नेत्यांचे सुरक्षा कवच कमी करण्यात आले. बदललेल्या राजकीय परिस्थितीत, बहुतेक राजकीय नेत्यांना पूर्वीसारखा धोका नाही आणि नवीन मंत्रिमंडळ आणि सरकारची रचना पाहता, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. 2022 बंडखोर शिवसेना आमदारांना त्यांच्या धोक्यामुळे वाढीव सुरक्षा देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंडाला पाठिंबा देणाऱ्या राज्यातील 44 आमदार आणि 11 लोकसभा खासदारांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली होती.

(नक्की वाचा-  EXCLUSIVE: नोकरी गेली, घर गेलं, पक्षाने काय दिलं? निष्ठावंत शिवसैनिकाचा उद्विग्न सवाल; ठाकरेंना सुनावलं)

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा वाद 

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुनही शिवसेना भाजपमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्रिपदे शिवसेनेच्या नेत्यांना देण्यास नकार दिल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती सरकारने रद्द केल्यानंतर, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणावही स्पष्ट दिसत आहे.

Advertisement

कुंभमेळ्यावरील फडणवीसांच्या बैठकीला शिंदे गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरील महत्त्वाच्या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संभाव्य मतभेद अधिक स्पष्ट झाले. त्याऐवजी, त्यांनी या आठवड्यात स्वतःची समांतर बैठक आयोजित केली. हे फडणवीसांच्या अधिकाराला थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. विरोधकांनीही यावरुन महायुतीवर निशाणा साधला होता. 

(Devendra Fadnavis मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा)

राजकीय शत्रूंशी वाढती जवळीक

गेल्या अडीच महिन्यांत शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन वेळा भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची दोनदा तर उद्धव ठाकरे यांनी एकदा भेट घेतली होती. तर ठाकरे गटाचे इतर वरिष्ठ नेत्यांनीही फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि मराठा योद्धा महादजी शिंदे यांच्या नावाने स्थापित पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. शरद पवारांनी शिंदे यांचे कौतुकही केले. ज्यामुळे ठाकरे गटाने उघड नाराजी व्यक्त केली होती. 

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)

मनसेसोबत युतीची चर्चा?

भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ज्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकीत भाजप राज यांना सोबत घेईल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेला एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीत सहभागी होता आलं नव्हतं अशी माहिती समोर येत आहे. यावरुन मनसे नेत्यांना राज ठाकरेंकडे नाराजी देखील व्यक्त केली होती.   

एकनाथ शिंदे यांनी मात्र देवेंद्र फडणवीसांसोबत शीतयुद्ध असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. आमच्यात कोणतेही शीतयुद्ध नाही. विकासाला विरोध करणाऱ्यांविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. 

Advertisement
Topics mentioned in this article