लोकसभा निवडणुकीत खराब प्रदर्शनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकारमधून बाहेर पडून संघटनेत काम करण्याची इच्छा सार्वजनिकपणे व्यक्त केली होती. त्यावेळी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीसांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. (Devendra Fadanvis BJP National President)
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत फडणवीसांचं नाव सर्वात पुढे असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय अध्यक्षपदाच्या शर्यतीत भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होणार आहे.
नक्की वाचा - जागा वाटपाबाबत मविआमध्ये हालचालींना वेग, काँग्रेसनेते मातोश्रीवर, काय ठरलं?
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय. अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही नावे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षाच्या खराब कामगिरीनंतर फडणवीस यांनी सरकारपासून दूर जाऊन संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता फडणवीस यांची संघटनेत मोठी भूमिका असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढत थेट देशाच्या राजकारणात सक्रीय करण्याचे संकेत मिळत आहेत.