जाहिरात

कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतदार यादीतील गोंधळ आणि 'मतचोरी'च्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले होते.

कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे

राहुल कुलकर्णी, पुणे

'मतचोरी'च्या आरोपांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. 10 दिवसांच्या आत शपथपत्रासह आपल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

नेमके प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतदार यादीतील गोंधळ आणि 'मतचोरी'च्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले होते. याच आरोपांबाबत निवडणूक आयोगाने त्यांना आधीच पत्र पाठवले होते, ज्याची आठवण महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आता करून दिली आहे.

(नक्की वाचा- Bhaskar Jadhav: 'भिडा, नडा, एकटा बास', ब्राम्हण समाज अन् भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत का?)

या स्मरणपत्रात म्हटले आहे की, 'Registration of Electors Rules, 1960' च्या Rule 20(3)(b) नुसार राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांचे समर्थन करणारे शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावे सादर करावीत. असे केल्यास, 'Representation of the People Act, 1950' आणि 'Registration of Electors Rules, 1960' नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करता येईल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाप्रमाणेच महाराष्ट्र आयोगानेही नोटीस पाठवल्याने राहुल गांधी यांच्यावर आता दोन्ही राज्यांतील निवडणूक आयोगांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

'मतचोरी'चा आरोप आणि आयोगाची भूमिका

राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महादेवपुर विधानसभा मतदारसंघात 'मतचोरी' झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी असा दावा केला होता की, मतदार यादीतून काही पात्र मतदारांची नावे वगळली गेली आहेत, तर काही अपात्र मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर)

या आरोपांना पुष्टी देण्यासाठी राहुल गांधी यांनी शाकुन राणी या मतदाराने दुहेरी मतदान केल्याचा पुरावा सादर केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, शाकुन राणी यांनी फक्त एकदाच मतदान केले आहे. तसेच, राहुल गांधी यांनी सादर केलेला टिकमार्क असलेला दस्तऐवज पोलिंग अधिकाऱ्याने जारी केलेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी Rule 20(3)(b) अंतर्गत राहुल गांधी यांना एक शपथपत्र सादर करण्यास सांगत आहेत, जेणेकरून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com