Uttan-Virar Sea Link : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फुटणार; उत्तन-विरार सी लिंकला हिरवा कंदील

Uttan-Virar Sea Link : एमएमआरडीए स्वतःच्या संसाधनातून 3,306 कोटी देणार आहे. उर्वरित 44,332 कोटी रुपये वित्तीय संस्थांकडून बाह्य कर्ज म्हणून उभारले जातील. हा प्रकल्प 25% इक्विटी आणि 75% कर्ज असा असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने सुधारित खर्चासह नुकतीच मंजुरी दिली आहे. नवीन डिझाइनमुळे या सी लिंकच्या एकूण खर्चात 30,000 कोटींची मोठी बचत झाली असून, प्रकल्पाचा सुधारित खर्च आता 58,754 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

कसा असेल उत्तन-विरार सी लिंक?

शासन निर्णयानुसार, या सी लिंकची एकूण लांबी 55.12 किमी असेल. यात मुख्य सी लिंक 24.35 किमी  आणि जोडणारे रस्ते 30.77 किमी असतील. हा प्रकल्प 60 महिन्यांत म्हणजेच 5 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

उत्तन-विरार सी लिंक हा मुंबईच्या पश्चिम कॉरिडॉरवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हा सी लिंक मुंबई उपनगरांना आगामी वाढवण बंदराशी जोडणार आहे. ज्यामुळे व्यापारी वाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्ही अधिक सोयीस्कर होतील.

(नक्की वाचा- Nagpur News: धक्कादायक! गांजा तस्करीप्रकरणी भाजपच्या युवा नेत्यासह 6 जणांना अटक)

कर्ज कसं उभारणार?

राज्य सरकार बिनव्याजी सॉफ्ट कर्ज म्हणून 11,116 कोटी रुपये देणार आहे. या निधीतून राज्य आणि केंद्रीय कर 8,236 कोटी रुपये, भूसंपादन 2,619 कोटी रुपये आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत 261 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Advertisement

एमएमआरडीए स्वतःच्या संसाधनातून 3,306 कोटी देणार आहे. उर्वरित 44,332 कोटी रुपये वित्तीय संस्थांकडून बाह्य कर्ज म्हणून उभारले जातील. हा प्रकल्प 25% इक्विटी आणि 75% कर्ज असा असेल.

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

कर्ज परतफेडीची योजना

एमएमआरडीएला टोल आकारण्याची आणि जाहिराती तसेच व्यावसायिक सेवांमधून महसूल गोळा करण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे कर्जाची परतफेड केली जाईल.

Topics mentioned in this article