चिंताजनक! राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले; विधानसभेत धक्कादायक आकडेवारी सादर

Missing Women and Girls Data : राज्यात 2025साली बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ झाली असून, महिलांचा आकडा 48,278 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन मुस्कान' आणि शोधमोहिमेच्या प्रगतीबाबत सभागृहात माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रातील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत राज्य शासनाने विधानसभेत अत्यंत धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.  2024 च्या तुलनेत 2025 मध्ये बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींच्या संख्येत वाढ झाली असून, हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.

बेपत्ता महिला व मुलींची तुलनात्मक आकडेवारी

शासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये बेपत्ता महिलांची संख्या 45 हजार 662 होती, तर अल्पवयीन मुलींची संख्या 11 हजार 316 होती.  एका वर्षात ही संख्या वाढली. 2025 मध्ये बेपत्ता महिलांची संख्या 48 हजार 278 होती, तर अल्पवयीन मुलींची संख्या 13 हजार 113 होती.

2025 साली बेपत्ता महिलांच्या संख्येत सुमारे 2,616 नी वाढ झाली आहे, तर अल्पवयीन मुलींच्या संख्येत 797 नी वाढ झाली आहे. ही वाढती संख्या रोखण्यासाठी आणि मानवी तस्करीसारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलीस दल विशेष तांत्रिक मदत घेत आहे.

(नक्की वाचा-  Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)

'ऑपरेशन मुस्कान' आणि शोधमोहीम

हरवलेल्या मुला-मुलींना शोधण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत आतापर्यंत एकूण 41,193 लहान मुले आणि मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता महिलांपैकी 55-60% महिला पहिल्या वर्षभरात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत हे प्रमाण 90% पर्यंत पोहोचते. महिलांचा शोध घेण्याच्या दरात 10% नी वाढ झाली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.  "साधारणपणे वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत घरचे लोक पाठपुरावा करणे सोडून देतात, ही चिंतेची बाब आहे. दर महिन्याला विशेष बैठक घेतली जाते, ज्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आढावा घेतात. उत्तम कामगिरी करणाऱ्यांची दखल घेतली जाते."

(नक्की वाचा-  Gold Rate: सोन्याचे दर प्रतितोळे 3 लाखांवर पोहोचणार? युद्धामुळे सोन्यात ऐतिहासिक तेजीचे संकेत)

पोलीस स्थानकांचे मार्किंग 

कोणत्या पोलीस स्थानकाने सर्वाधिक बेपत्ता महिलांचा शोध लावला, यावर आता विशेष लक्ष दिले जात असून त्यात सुधारणा करण्यात येत आहे. जोपर्यंत आपण 95-96% शोध घेण्याच्या दरापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत विशेष मोहिमा सुरूच राहतील, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article