Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे महायुतीत तणाव, अंतर्गत वाद टाळण्यासाठी मोठा निर्णय

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहे. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल.

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

महायुतीमध्ये तिन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षाचे एक-एक मुख्य प्रवक्ते महायुतीकडून नियुक्त केले जाणार आहे. तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते जे बोलतील तीच महायुतीची अधिकृत भूमिका असेल.  या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणाचीही अधिकृत भूमिका नसणार, असा निर्णय महायुतीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

(नक्की वाचा - 'नालायक खाते...' अजित पवारांच्या 'गुलाबी' खात्याला सहकाऱ्यानेच टोचले 'काटे')

नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मतभेत निर्माण होत आहेत. महायुती बरोबरच बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे त्यांचे पक्षही अडचणीत येत असल्याची तिन्ही घटक पक्षाची भावना आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

(नक्की वाचा- विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला)

महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिन्ही पक्षाकडून एक-एक नाव दिलं जाणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी या प्रवक्त्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. सरकार, पक्ष, जागावाटप याबाबतच्या भूमिका हे तिन्ही प्रवक्ते मांडतील. त्यांची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असेल. त्यामुळे कोणताही नेता काहीही बोलला तरी त्याला काहीही महत्व नसणार. त्यामुळे तिन्ही पक्षाचे मुख्य प्रवक्ते कोण असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article