Maharashtra Rain Update : जून महिन्याचा पंधरवडा कोरडा गेला. अखेर रविवारपासून मुंबईसह उपनगरात वळवाच्या सरींनी हजेरी लावली आहे. सोमवार २२ जून रोजीही मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र अद्यापही नागरिक मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पुढील ५ दिवस महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?
२२ ते २६ जून यादरम्यान, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. या दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
२२ जून - नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, सातारा
२३ जून - पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली.
२४ जून - पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली.
२५ जून - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
२६ जून - रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, पुणे, अहिल्यानगर, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
२२ जून - वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया.
२३ जून - वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया.
२४ जून - नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.