अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पुण्यात एक भयंकर घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील चंदन नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा रागातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. घरात घुसून प्रियकराने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाला आहे. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी प्रियकर दिलीप राठोड नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील मॉलमध्ये दोघेही एकत्रित करायचे काम
पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये दोघे काम करत होते.उजालादेवी दोहरे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा सगळा प्रकार पुण्यातील चंदननगर भागात 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडला.आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी हे दोघेही पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. या ठिकाणी त्यांची ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात बदलले.
नक्की वाचा >> Ambarnath News: भाजप गटनेत्याने काढले नगरसेविकांचे 'ते' व्हिडीओ, अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप वाद पुन्हा पेटणार?
"आपले लग्न ठरलं आहे"
दरम्यान,संबंधित तरुणी तिच्या मूळ गावी गेल्यानंतर तिच्या कुटुंबांनी तिचे लग्न ठरवले."आपले लग्न ठरलं आहे"हे तरुणीने आरोपीला सांगितले होते.दरम्यान,हे लग्न मान्य नसलेल्या तरुणाने रागाच्या भरात 29 तारखेला तिच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार केले. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा >> Pune News: गुंजवणी धरणाच्या 'त्या' कामावरून शेतकरी आक्रमक,अख्खं वाल्हे गाव केलं बंद,शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world