Maharashtra rain forecast 2026: राज्यात पुढील 4 दिवस हवामान कसे असेल याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या या इशाऱ्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यामध्ये 31 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीत हवामानाची स्थिती कशी राहील, याचा सविस्तर अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै 2026 रोजी 31 जुलै 2026 रोजी नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या दिवशी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड आणि सातारा घाट भागात ऑरेंज अलर्ट असेल. मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा! )
ऑगस्टच्या सुरुवातीला कसं असेल हवामान?
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. या दिवशी नाशिक घाट, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट भागात यलो अलर्ट असेल, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहील.
यानंतर 2 ऑगस्ट 2026 रोजी केवळ रायगड आणि पुणे घाट परिसरात यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट असेल. तर 3 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामानाचा कोणताही मोठा धोका असणार नाही. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवास करताना योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world