मविआवर मोठी नामुष्की; सत्ता सोडा विरोध पक्षनेतेपदही मिळणार नाही

लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विरोधी पक्षनेते पद मिळावे एवढ्या जागा देखील महायुतीने महाविकास आघाडीसाठी सोडल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीवर विरोधी पक्षनेत्याविनाच विधानसभेत बसण्याची नामुष्की ओढावली आहे. 

विधानसबा निवडणुकीच्या निकालाचे आतापर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 132 जागांवर आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गट 56 जागांच्या आघाडीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर असून तिसऱ्या स्थानावर आहे. अशारितीने महायुतीच्या तिन्ही पक्षांनी चमकदार कामगिरी केली आहे.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय? )

तर दुसरीकडे लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहेत.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )

विरोधी पक्षनेते पदासाठी नियम काय?

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला एकूण जागांपैकी 10 टक्के जागा मिळवणे आवश्यक असते. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी किमान 29 जागा मिळवणे गरजेचं आहे. मात्र काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कोणताही पक्ष 29 जागा जिंकण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुणालाही विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही.   

Advertisement