महायुतीची जागावाटपाचं सूत्र अद्यापही समोर आलेलं नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांचा घोषणा केली आहे. भाजपने 121 जागा जाहीर केल्या आहेत. शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 49 उमेदवारांचा घोषणा केली आहे. मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महायुतीचं जागावाटपाचा सूत्र कसं असेल याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे. NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या विशेष कार्यक्रम ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, लोकसभेमध्ये जागावाटपाला उशीर झाल्याचा आम्हाल फटका बसला. त्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला 145 ते 155 जागा मिळतील. शिवसेनेला 80-85 जागा मिळतील, तर अजित पवार गटाला 50-60 जागा मिळतील.
लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याचं आम्ही चिंतन केलं आणि त्यातून आम्ही बाहेर आलो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला तो म्हणजे फेक नरेटिव्हचा. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा आम्ही दुर्लक्ष केला. त्यात बसलेला फटका मोठा होता. मात्र विरोधकांना चांगलं यश मिळालं त्यात त्यांचा एकट्याचा वाटा नाही. केवळ फेक नरेटिव्ह नाही तर काही संस्था, संघटना आणि त्यातले शहरी नक्षलवादी यांनी मिळून एकत्र केलेला प्रयत्नांचा विरोधकांना फायदा झाला.
(नक्की वाचा- 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)
महाराष्ट्राचा जाहीरनामा या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये जयंत पाटील आणि आशिष शेलार यांची गळाभेट...
— NDTV Marathi (@NDTVMarathi) October 27, 2024
पाहा LIVE - https://t.co/CYbgUF3BM4#NDTVMarathiElectionConclave #MaharashtraPolitics #NDTVMarathi #MaharashtraElection2024 #MaharashtrachaJahirnama pic.twitter.com/VPFXdkbF3M
त्यांतर मोदी आणि भाजप नको म्हणणाऱ्या सर्वांना थेट उत्तर द्यायला पाहिजे कळालं. त्याला आम्ही सुरुवातही केली आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केले. यातून लक्षात आलं की लोकसभेत आम्ही उत्तरे देत होते. मात्र आता विरोधक आमच्या कामावर उत्तरे शोधत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हे यश आम्ही तिन्ही पक्षांनी मिळवलं. आमच्याबद्दलची खरी चर्चा जमिनीवर करण्यासाठी आमच्या विचारसंस्था देखील आम्हाला प्रामाणिकपणे मदत करत आहेत, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- युगेंद्र पवारांसमोर उमेदवार देणे टाळता आलं असतं का? रुपाली चाकणकरांनी म्हटलं...)
मुस्लीम मतदारांचा फायदा लोकसभेत महाविकास आघाडीला झाला. विधानसभेतही तशीच परिस्थिती राहील, असं बोललं जात आहे. याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, मुस्लीम मतदारांना आता ठरवायची वेळ आली आहे की भावनिक मुद्द्यांवरच मतदान करायचं की येणाऱ्या आपल्या पीढीसाठी विकासाच्या यात्रेत सहभागी व्हायचं. मुस्लीम मतदारांना आवाहन करेन की भावनात्मक मुद्द्यांचं महत्त्व असतं, मी त्याला टाळणार नाही. मात्र याचा कुठेतरी सुवर्णमध्ये गाठणे आवश्यक आहे. मी एकाच बाजूला राहील हे कुठल्याही जाती, भाषा, धर्म किंवा त्या समाजाला तर पूरक नाही, शिवाय लोकशाहीलाही घातक आहे, आशिष शेलार यांनी म्हटलं.
व्होट जिहाद काय आहे?
विरोधकांनी याचा उपयोग लोकसभा निवडणूक काळात आमच्या विरोधात मतदान करणार आहेत, असं वाटणाऱ्या मतदारांना आणखी असुरक्षित केलं. यात आमच्याकडील काही खालच्या स्थरावरील नेत्यांकडून काही गोष्टी झाल्या. त्याचा उपयोग करुन असुरक्षिततेची भावाना या मतदारांमध्ये वाढवली गेली. कुठल्याही टोकापर्यंत खोटं विरोधकांकडून पसरवलं गेलं. यातून आम्हाला फटका बसला. याला आम्ही 'व्होट जिहाद' म्हणत आहोत. या व्होट जिहादला थांबवायचं असेल असेल तर मुस्लीम मतदारांनीच पुढे आलं पाहिजे आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world