जाहिरात

NDTV Conclave 2026 : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर? आशिष शेलारांनी एका शब्दातच विषय संपवला!

गेले कित्येक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे. अशातच मंत्री आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे.

NDTV Conclave 2026 : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर? आशिष शेलारांनी एका शब्दातच विषय संपवला!
Ashish Shelar On BMC Election 2026

Ashish Shelar NDTV Conclave Interview : येत्या 15 जानेवारीला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशातच ठाकरे ब्रँड आणि महायुती असा जोरदार राजकीय संघर्ष रंगला आहे. गेले कित्येक वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता असणाऱ्या मुंबई महापालिकेवर यंदाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे. अशातच मंत्री आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. मुंबई महापालिकेत यावेळी भाजपचा महापौर असेल का? या प्रश्नाचं उत्तर देत शेलार म्हणाले, "महायुतीचा नक्कीच मिळेल. महायुतीचा बनेल, दोन्ही नेते बसून निर्णय घेतील".महायुती जिंकली तर शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर होईल का? यावर बोलताना शेलार यांनी एकसारखच उत्तर दिलं की, "महायुतीचा बनेल आणि दोन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेतील.

मोठ्या भावाच्या भूमिकेत तर तुम्हीच आहात. 137 जागांवर तुम्ही लढत आहात. 90 जागा शिवसेनेला दिल्या आहेत. ठाणे आम्हाला द्या..मुंबई आम्ही अॅडजस्ट करतो, अशी काही डील झाली होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना शेलार म्हणाले, "डीलचा विषय नाहीय. हा विषय समजून घेण्याचा आहे. आम्ही एकत्र लढणार आणि एकमेकांना साथ देणार, असं आम्ही ठरवलं होतं. हे कोणी नाकारू शकत नाही. देवेंद्रजींचं स्पष्ट मत होतं की, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचं नेतृ्त्वही आहे आणि त्यांना साथही द्यायची आहे. प्रमुख भूमिकेत ते आहेत आणि राहिले पाहिजेत. तिथे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावलं", असं मोठं विधान मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. ते एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. 

नक्की वाचा >> NDTV Power Play Conclave : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! "कोस्टल रोडला टोल नसणार", राहुल शेवाळेंचं मोठं विधान!

"उद्धव ठाकरेंचा अहंकार वाढला होता..",आशिष शेलार काय म्हणाले?

"महायुतीच्या अडीच-अडीच वर्षांच्या प्लॅनबाबत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, "त्यावेळी मी अध्यक्ष होतो. आज मी निवडणूक प्रमुख आहे. देवेंद्रजी तेव्हाही मुख्यमंत्री होते आणि आजही मुख्यमंत्री आहेत.अडीच-अडीच वर्षांचा प्लॅन खरा नव्हता. उद्धव ठाकरेंचा अहंकार वाढला होता. या निवडणुकीत उद्धव ठाकरे सव्वाशे वरून 84 वर आले होते. पण अहंकार असल्याने ते बोलायला तयार नव्हते. त्यांच्यातर्फे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी बोलणं केलं होतं. राज्य सरकारमध्ये आम्ही एकत्र होतो.यासाठी भाजपने आणि देवेंद्रजीने मोठं मन दाखवलं.तेव्हा निर्णय झाला की,त्यांच्याच पक्षाचा महापौर बनेल. ती भूमिका आम्ही साकारली होती".

नक्की वाचा >> NDTV BMC Powerplay LIVE Updates: बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार - नितेश राणे

"मुंबईत आम्ही जास्त जागा जिंकतही आलो आहोत. यावेळी पहिल्यांदा एकत्र लढत आहोत. जिथे ते जिंकू शकतात आणि जिथे आम्ही जिंकू शकतो, यासाठी  योग्य जागांचा आकडा देण्यात आला. याप्रकारे आम्ही निर्णय घेतला". मुंबई महापालिकेत यावेळी भाजपचा महापौर असेल का? या प्रश्नाचं उत्तर देत शेलार म्हणाले, "महायुतीचा नक्कीच मिळेल. महायुतीचा बनेल, दोन्ही नेते बसून निर्णय घेतील".महायुती जिंकली तर शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर होईल का? यावर बोलताना शेलार यांनी एकसारखच उत्तर दिलं की, "महायुतीचा बनेल आणि दोन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com