Mumbai News: काळ्या कागदाचं डॉलर बनवण्याचा आमीष, मुंबईत अनेकांचा लाखोंची फसवणूक, 4 अटकेत

Mumbai News : अफ्जल सय्यद, रईस सय्यद, आदिल खान आणि अबिदूर शाह या चार आरोपींना मानखुर्द येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे, जिथून ते हे रॅकेट चालवत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Crime News : काळ्या कागदाचं डॉलरमध्ये रुपांतर करून दाखवून चार भामट्यांनी लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मुबंईतून समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  आरोपी लोकांना काळ्या कागदाचे रासायनिक द्रावणाचा वापर करून अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतर करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होते.  

अफ्जल सय्यद, रईस सय्यद, आदिल खान आणि अबिदूर शाह या चार आरोपींना मानखुर्द येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे, जिथून ते हे रॅकेट चालवत होते. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांना भारतीय रुपयांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते. प्रात्यक्षिकादरम्यान, ते काही काळ्या रंगाने लेपित अमेरिकन डॉलर रासायनिक द्रावणामध्ये बुडवून दाखवत होते. ज्यामुळे लोकांना असे वाटत होते की काळ्या कागदाचे संपूर्ण बंडल खरे डॉलर आहेत.

(नक्की वाचा- Karnataka Crime News: भुताने झपाटल्याचा संशय, अमानुष मारहाणीत महिलेचा तडफडून मृत्यू, मुलासह तिघांना अटक)

आरोपींनी 7 जुलै रोजी, तक्रारदारांना 30 हजार रुपये देण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी कोणतीही अमेरिकन चलन न देता पळून गेले. ज्या लोकांनी पैसे दिले त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. या तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमध्ये अशाच प्रकारच्या युक्त्या वापरून अनेक लोकांना फसवले होते. 

(नक्की वाचा-  Nagpur Crime : नागपुरातील कुख्यात गुंडाचा भीषण The End; विरोधी टोळीने रात्रीच्या अंधारात गेला गेम)

सध्या सुरू असलेल्या या फसवणूक प्रकरणात 24.7 लाख रुपयांची रक्कम गुंतलेली असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी 42 डॉलर आकाराचे काळे कागदाचे बंडल, दोन $1 चे खरे अमेरिकन डॉलर, सहा ॲल्युमिनियम बाटल्यांमध्ये साठवलेले रासायनिक पदार्थ, आरोपींचे सहा मोबाईल फोन आणि 30,400 रुपये जप्त केले आहेत. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या अफजल अली सय्यदवर यापूर्वी नागपाडा पोलीस ठाण्यात कलम 420 आणि 34  अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल आहे.

Advertisement

Topics mentioned in this article