Mumbai News : राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात तब्बल 1 लाख 82 हजार 443 बालके कुपोषित असल्याची आकडेवारी सरकारने जारी केली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
मुंबई उपनगरमध्ये 16 हजार 344 कुपोषित बालके असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 13,457 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 2887 आहे. तर राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 1 लाख 51 हजार 643 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30800 एवढी आहे. यावरून कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या वाढल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. नाशिकमध्ये 9 हजार 852 कुपोषित बालकांची संख्या यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 8944 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1852 आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: अदृश्य शक्तीचा भास झाल्याने समुद्रात उडी; बुडणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले!)
ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांचा संख्या 7366 तर तीव्र कुपोषित बालकांची 844 आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके 7410 तर तीव्र कुपोषित 1666 बालके आहेत. धुळे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके 6377 तर तीव्र कुपोषित बालके 1741 आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके 6487 तर तीव्र कुपोषित बालके 1439 आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके 6715 तर तीव्र कुपोषित बालके 1373 आहेत.