जाहिरात

Pune News : पुण्याच्या मुळा नदीच्या किनारी थरकाप उडवणारी घटना, मित्रांसोबत पार्टी करताना तरुणासोबत घडलं भयंकर

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील मुळा नदीच्या किनारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Pune News : पुण्याच्या मुळा नदीच्या किनारी थरकाप उडवणारी घटना, मित्रांसोबत पार्टी करताना तरुणासोबत घडलं भयंकर
Pune Mula River Drowning Case
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

Pune Mula River Viral News Today :  पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील मुळा नदीच्या किनारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.पंकज भिमराव केदारी (36) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पंकज पुण्यातील पाषाण येथील रहिवासी होता. या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,पंकज शनिवारी दुपारी मित्रांसह मुलखेड येथे मुळा नदीच्या किनारी गेला आणि पार्टी दरम्यान पाण्यात उतरला.त्यानंतर पाण्यात तो अचानक बुडू लागला.काही वेळानंतर तो दिसेनासा झाला. स्थानिकांसह त्याच्या मित्रांनी या घटनेची माहिती 
मुळशीतील पौड पोलिसांना दिली.

नक्की वाचा >> Pune News: पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत..इंदापूरच्या ओंकारने सायकलवरून चक्क केदारनाथ गाठलं, थक्क करणारा Video

पंकजचा मृतदेह मुळा नदीच्या पाण्यावर तरंगला आणि..

त्यानंतर पोलीस तात्काळ मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह घटनास्थळी दाखल झाले.परंतु, रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्य होऊ शकले नाही.त्यानंतर आज सकाळी पंकजचा मृतदेह मुळा नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचं स्थानिक सरपंच आणि पोलीस पाटील यांना समजलं. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.

नक्की वाचा >> Viral Video: वृद्धाने 'त्या' मेट्रो स्टेशनवर महिलेसमोरच केला घाणेरडा प्रकार,म्हणाला, "तुला जे करायचे ते कर.."

प्रशासनाकडून नागरिकांना मोठं आवाहन

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंकज केदारी याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि ग्रामीण रुग्णालय पौड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या घटनेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी.नदी किनारी वावरताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com