Maratha Reservation : 'आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या घरावर'; फडणवीसांच्या भेटीनंतर केरेंचा हल्लाबोल

आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान रमेश केरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर संताप व्यक्त केला. 'आमची भूमिका आताही कायम आहे. जोपर्यंत सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार असल्याचं जाहीर करीत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही. शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री राहिले, मात्र तरीही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे खरं पाहता मराठा आरक्षणाचा मारेकरी कोणी असेल तर ते शरद पवार आहेत'; असं म्हणत रमेश केरे पाटील यांनी टीका केली.

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत आल्यानंतर सारथीसारखी योजना आणली. आर्थिक महाविकास महामंडळ सुरू केलं. 13 टक्के आरक्षण दिलं.. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा. मी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर गेले होतो, त्यानंतर आज फडणवीसांकडे गेलो, उद्या मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या घरी होईल असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा उचलला जात आहे.जरांगे पाटलांचा माझ्याशी काही संबंध नाही. ठोक मोर्चा तुमच्या प्रत्येक आंदोलनात तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे, असंही ते म्हणाले.    

Advertisement

नक्की वाचा - 'बांगलादेशवरून भारतातील जुमलेबाज-हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या लक्षात येतंय का?' 'सामना'तून केंद्रावर हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज मुंबईत आंदोलन पुकारलं होतं. मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात असताना पोलिसांनी अडवलं. गिरगाव चौपाटीजवळ अडवल्यानंतर रमेश केरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फक्त भेटायचे आहे अशी पोलिसांकडे विनंती केली. या विनंतीला मान देऊन पोलीस रमेश किरे यांच्यासह त्यांच्या दहा शिष्टमंडळांना देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याकडे पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाण्यात आलं. केरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार आणि मराठा ठोक क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ याला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. 

Advertisement

आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. रमेश केरे आणि दहा जणांचे शिष्ट मंडळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. शरद पवार दिल्लीत असल्याने त्यांच्या घराबाहेर होणारं आंदोलन रद्द करण्यात आलं. 

Advertisement