मराठा हेच कुणबी ? हैदराबाद गॅझेट नेमकं काय? विश्वास पाटलांचे मोठे संशोधन

हे हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? मराठा आरक्षणासाठी त्याचे महत्व काय आहे? याबाबत इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी काही संशोधन केले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

मराठा आरक्षणाचा विषय ज्या-ज्या वेळी येतो, त्या वेळी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतो. हैदराबाद गॅझेटचा उल्लेख मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी ही केला आहे. त्यामुळे हे हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे? मराठा आरक्षणासाठी त्याचे महत्व काय आहे? याबाबत इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी काही संशोधन केले आहे. त्यातून त्यांनी निजामकाळी मराठ्यांचा उल्लेख काय होता? कुणबी मराठा आणि मराठ हे एकच आहेत का याची ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निजामाच्या अमलाखाली 17 जिल्हे होते. त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश होता. त्यावेळी म्हणजे 1862 साली ब्रिटीश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना केली होती. त्याची सुरूवात 1850 च्या दरम्यान करण्यात आली होती. तर 1881 साली जनगणनेचे रेकॉर्ड प्रकाशित करण्यात आले होते. त्यात जे गॅझेट तयार करण्यात आले होते त्यालाच हैदराबाद गॅझेटही म्हटले जाते. या जनगणनेमध्ये जाती शिवाय कोणी विवाहीत, कोण अविवाही,विधूर याचाही उल्लेख होता. 

ट्रेंडिंग बातमी -  'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले

त्यावेळी निजामाच्या राज्यात 17 जिल्हे होते. त्याची जवळपास लोकसंख्या ही 98 लाख 45 हजाराच्या घरात होती. त्यात कुणब्यांची संख्या ही जवळपास 16 लाखाच्या घरात होती. तर मराठा म्हणून उल्लेख चार लाखाच्या घरात होता. मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख करताना या गॅझेटमध्ये  मराठा कुणबी कापू असा उल्लेख आहे. शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा असाही स्पष्ट उल्लेख या ब्रिटीशकालीन गॅझेटमध्ये असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य

कुणबी मराठा याचा उल्लेख हा जवळपास 45 वर्षापासून जुन्या रेकॉर्डमध्ये आढळून येतो. त्यामुळे जे कुणबी मराठा आहेत ते आरक्षणासाठी किंवा प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र ठरू शकतात असेही त्यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेट म्हणजे ब्रिटीश कालीन भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येचा इतिहास असंही पाटील सांगतात.  विशेष म्हणजे हे रेकॉर्ड ज्यावेळी हे जिल्हे महाराष्ट्रात आले त्यावेळी ते तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं गेलं होतं. त्यामुळे ते रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे असेही ते म्हणाले. या शिवाय आणखी काही रेकॉर्ड हैदराबादला असेल तर कोणीही ते समोर आणावे, त्याचाही फायदा होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.  

ट्रेंडिंग बातमी - शिंदेंकडून महामंडळांचे वाटप, भाजप- राष्ट्रवादी नेत्यांच्या पदरात काय? पवारांनी बोलवली बैठक

मराठा समाज या सर्व प्रक्रियात भरडला गेला आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे. तो आता भायनक रूप घेत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही मराठा आणि अस्पृष्यांचा आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने विचार व्हायला पाहीजे असे 1927 साली म्हटले होते याचा दाखला ही पाटील यांनी दिला. शिवाय महात्मा फुले यांनीही शेतकऱ्यांचा आसूडमध्ये भाऊ हिस्साच्या माध्यमातून कुणब्यांची आवस्था काय हे मांडले होते. त्यामुळे जो मराठा कुणबी समाज आहे तो आरक्षणास पात्र आहे असे ही पाटील यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - 'मॅडम नाही माँ'अमृता फडणवीस पुन्हा चर्चा का?

मराठ्यांकडे किंवा कुणब्यांकडे तुच्छतेने पाहीले जाते. पण ते चुकीचे आहे. काही राजघराणी आणि राज्यकर्ते म्हणजे सगळे मराठे किंवा कुणबी नाहीत असे पाटील यांनी स्पष्ट केले. जनगणना जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ज्या वेळी होईल त्यावेळी मराठ्यांच्या मुलांचे आणि मुलींचे लग्न झाले आहे की नाही याचीही नोंद घ्यावी. त्यातील दहा पैकी सहा ते सात जण हे अविवाहीत असतील. चांगले शिक्षण असूनही केवळ नोकरी नसल्याने त्यांचे विवाह झालेले नाहीत ही वस्तूस्थिती असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.   

नक्की वाचा - शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, 2 तास मिरवणुकीचा खोळंबा

पंजाबराव देशमुख यांचेही उदाहरण यावेळी पाटील यांनी दिले आहे. विदर्भातील मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद करण्यात आली. त्यामुळे तिथल्या मराठ्यांना कुणबी म्हणून फायदे मिळत आहेत. तोच न्याय इतर मराठ्यांनाही मिळाला पाहीजे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असताना पंजाबरावांनी विदर्भा प्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांनीही कुणबी ही नोंद करावी असे सांगितले होते. पण आम्ही जातीवंत मराठे कुणबी नोंद कशी करायची असा हेका काहींनी धरला होता अशी आठवणही पाटील यांनी सांगितली. दरम्यान कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहीजे असेही ते म्हणाले.