
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या काहीना काही कारणाने नेहमीच चर्चत असतात. आता मात्र त्या चर्चेत आल्यात त्या त्यांच्या विधानाने किंवा त्यांच्या कोणत्या कृत्याने नाही. तर त्यांच्यावर भाजपचे जेष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्या मुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोढा यांनी अमृता फडणवीस या मॅडम नाहीत तर माँ आहेत असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या माँ ने आता राजकारणातील कचरा साफ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरू आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिव्याज फाऊंडेशन हे अमृता फडणवीस यांची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून समुद्र किनाऱ्यावरील कचरा साफ करण्याचं काम करतात. गणेश विसर्जनानंतरही समुद्र किनाऱ्यावरील कचरा साफ केला जात आहे. त्यासाठी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा हे प्रमुख पाहूणे आले होते. यावेळी लोढा यांनी अमृता फडणवीस यांचे तोंडभरून कौतूक केले. शिवाय त्यांना राजकारणात येण्याचे आवाहन ही केले.
ट्रेंडिंग बातमी - 'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले
अमृता फडणवीस या मॅडम नाही तर आता माँ अमृता फडणवीस आहेत. अमृता फडणवीस यांनी आईचं रुप घेतलं आहे. अमृता फडणवीसांनी समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम हातात घेतले आहे. ते हे चांगले काम करत आहेत. पण मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता राजकारणातील कचराही साफ करावा. राज्यात राजकारणात कचरा झाला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही त्यांनी केले.
असे वक्तव्य करत मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांना एक प्रकारे आता राजकारणात या असेच सुचवले. माँ म्हणजे आई. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत ते अतिशय महत्वाचे आहे. पण त्यांनी आता राजकारणात उतरले पाहीजे असेच त्यांनी सुचित केले. त्यामुळे या सुचनेनंतर अमृता फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात आहेत. अशा वेळी अमृता फडणवीसांना राजकारणा बाहेर राहण्याचाच निर्णय घेतला. पण त्या पक्षांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world