कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या वादातून तीन जणांना बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली होती. अखिलेश शुक्ला या व्यक्ती ही मारहाण केली होती. परप्रांतीय व्यक्तीने मुजोरी करत मराठी माणसाला मारहाण केल्याने याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतल विधानपरिषदेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच आरोपी अखिलेश शुक्लाचं निलंबन केल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषेदेत या प्रकरणारवर म्हटलं की, "अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असे उद्गार काढले. यातून एक संतापाची लाट मराठी माणसामध्ये तयार झाली आहे. अखिलेश शुक्ला हा MTDC चा कर्मचारी आहे. याप्रकरणी पत्नीसह त्याच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद झाला आहे. त्याचं तत्काळ निलंबन देखील करण्याची कारवाई करण्यात आली आहे."
(नक्की वाचा- मंत्रालयातील अधिकाऱ्याची मराठी माणसाला मारहाण, कल्याणमधील प्रकार! मनसेनं दिला गंभीर इशारा)
"मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाच आहे , मराठी माणसाचाच राहील. कधी-कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही", असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
"भाजपचं सरकारचं आलं म्हणून हे झालं अशाप्रकराचं राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं. कारण आपण राजकाणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस हद्दपार का झाला? कुणाच्या काळात झाला? का मराठी माणसाला मुंबईतून ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि त्याच्या पलिकडे जावं लागलं?", असा सवाल फडणवीसांना विरोधकांना विचारला.
( नक्की वाचा : फायनान्स कंपनीच्या नावानं बनावट फोन करत लाखांची फसवणूक, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार! )
"काही लोक माजोरड्यापणाने बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला गालबोट लागलं. मात्र मी ठणकावून सांगतो कुठल्याही मराठी माणसावर येथे अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. मात्र शाखाहारी-मासांहारी भेदभाव करणे मान्य करता येणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यातर योग्य कारवाई केली जाईल. आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. त्यावर कुणा घाला घालत असेल तर त्यांच्यावर निश्चिक कडक कारवाई केली जाईल", असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.