जाहिरात

मुंबईच्या ट्रेनमध्ये महिलेला अचानक झाल्या प्रसुती वेदना, 'तो' प्रवासी बनला देवदूत,गोंडस बाळाचा Video व्हायरल

Preganant Woman Delivery In Mumbai Train Video :  सोशल मीडियावर असा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने प्रत्येक माणसाचं मन जिंकल आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खऱ्या जीवनाची '3 इडिएट्स मोमेंट'असा ट्रेंड सुरु केला आहे.

मुंबईच्या ट्रेनमध्ये महिलेला अचानक झाल्या प्रसुती वेदना, 'तो' प्रवासी बनला देवदूत,गोंडस बाळाचा Video व्हायरल
Woman Delivery In Mumbai Local Train
मुंबई:

Preganant Woman Delivery In Mumbai Train Video :  सोशल मीडियावर असा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने प्रत्येक माणसाचं मन जिंकल आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खऱ्या जीवनाची '3 इडिएट्स मोमेंट'असा ट्रेंड सुरु केला आहे. मुंबईत 12 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास एक महिला ट्रेनने प्रवास करत होती. त्याचदरम्यान या महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. पण त्यावेळी कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता. अशावेळी एक व्यक्ती त्या महिलेसाठी देवदूतच बनला. कारण त्या व्यक्तीने महिलेच्या प्रसुतीची सर्व परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. हा व्हिडीओ मानवता धर्माचं एक उत्तम उदाहरण असल्याचं नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटलं आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

म्यूजिशियन मंजीत ढिल्लो @manjeet9862 नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, एका महिला प्रवाशाला ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रसुती वेदना अचानक वाढल्या. ही स्थिती गंभीर झाल्यावर विकास बेंद्रे नावाच्या एका व्यक्तीनं राम मंदिर स्टेशनवर इमरजन्सी चैन ओढली आणि ट्रेनला थांबवलं. ढिल्लो यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, बाळ अर्धा आत आणि अर्धा बाहेर होता.

नक्की वाचा >> कुटुंबीयांचा प्रचंड विरोध, तरीही मुस्लीम मुलीनं हिंदू मुलासोबत संसार थाटला, नंतर जे घडलं..थेट Video शेअर केला

यामुळे दोघांच्याही जीवनाला धोका निर्माण झाला असता. त्यावेळी खरंच असं वाटलं की, देवानेच या व्यक्तीला तिथं पाठवलं..त्यावेळी कोणत्याही प्रकारची एम्बुलन्स किंवा मेडिकल स्टाफची तातडीनं मदत मिळाली नाही. विकासने त्याची मैत्रिण डॉ.देविका देशमुखला व्हिडीओ कॉल केला. त्यांनी डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करून महिलेची डिलिव्हरी सेफ केली. यावेळी ट्रेनमध्ये असणाऱ्या प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

ढिल्लोने पोस्टमध्ये पुढं म्हटलंय, महिलेच्या कुटुंबियांनी त्या महिलेला याआधी जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथून त्या महिलेला परत पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे तिला ट्रेनने प्रवास करावा लागला. पण डिलिव्हरी नंतर आई आणि बाळाला रुग्णालयात पाठवण्यात आलं. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा >> झुकेगा नही..उंच झाडावर बिबट्याने सिंहाला फोडला घाम, फांदी तुटताच गेम पलटला, Video पाहून लोटपोट हसाल

ढिल्लोच्या पोस्टला 55 हजारांहून अधिक लाईक्स आणि 8 लाख 60 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय, रिअर हिरो..दरम्यान, विकासने द बेटर इंडियाशी बोलताना म्हटलंय, मी पहिल्यांदाच असं काही केलं आहे. मी खूप घाबरलेलो होतो. पण मॅडमने व्हिडीओ कॉलवर मला मदत केली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com