- पनवेल की गोदरेज सिटी सोसायटी में मराठी भाषा को लेकर विवाद खड़ा हो गया.
- विवाद के दौरान विजय चांडेल ने मराठी भाषा से प्यार जताया लेकिन जबरन भाषा सीखने को गलत बताया.
- महिला से मराठी भाषा को लेकर विवाद का वीडियो विजय की पत्नी होमैरा ने रिकॉर्ड किया और पुलिस में शिकायत की गई
मुंबईजवळच्या पनवेल येथील 'गोदरेज सिटी सोसायटी'मध्ये मराठी भाषेवरून वाद झाल्याचा एक प्रकार समोर आला आहे. या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात एका ट्रॅव्हल ब्लॉगरने वादादरम्यान, मी मेलो तरी हिंदी बोलणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.
मुंबईजवळच्या पनवेल येथील 'गोदरेज सिटी सोसायटी'मध्ये मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. विजय चांडेल नावाच्या एका ट्रॅव्हल ब्लॉगरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये वादादरम्यान तो म्हणतोय की, मला मला मराठी येत नाही. मी मराठीत बोलत नाही आणि बोलणार पण नाही. मी हिंदी बोलतो आणि हिंदीच बोलणार. मी मेलो तरी मराठी बोलणार नाही, हिंदीच बोलणार. भारतात फक्त आणि फक्त हिंदीच बोलली जाईल. मला जबरदस्तीने मराठी भाषा शिकण्यास किंवा बोलण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.'
पाहा VIDEO
विजयने स्पष्ट केले की, त्यांना मराठी भाषेबद्दल कोणतीही अडचण नाही. "मला मराठी आवडते, पण कोणत्याही भाषेला जबरदस्तीने शिकायला लावणे किंवा बोलायला भाग पाडणे चुकीचे आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रकरण अंगलट येईल या भीतीने आता विजय चांडेल सांगत आहे की, त्याचा आणि पत्नीच्या कुटुंबाचा संबंध देशसेवेशी आहे. कारण दोघांचेही वडील 'डिफेन्स'मध्ये होते. 'आम्हाला कोणत्याही भाषेची समस्या नाही, पण या वादाचे मूळ कारण काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे,' असे त्याने म्हटले.
मात्र मराठी कुटुंबाशी बोलताना विजयचा माज स्पष्ट दिसत आहे. मराठी कुटुंबाशी भांडताना मराठी भाषेचा त्याने केलेले अनादर चुकून नाही तर जाणीवपूर्वक केला. विजयचा तोरा पाहून प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच चीड येईल. या घटनेमुळे मराठी आणि हिंदी भाषेवरून होणाऱ्या वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.