मुंबई-नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटाजवळ रविवारी दुधाचा टँकर दरीत कोसळला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र पावसामुळे मदत आणि बचावकार्यात अडचणी येत होत्या. आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोरीच्या साहाय्याने खाली उतरत चार गंभीर जखमींना आणि मृतदेह बाहेर काढले.
(नक्की वाचा- भयंकर दुर्दैवी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच 4 सख्ख्या भावंडांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिन्नरहून हा दुधाचा टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र नवीन कसारा घाटातील बगलर पॉईंटजवळ टँकरला अपघात झाला. ताबा सुटल्याने टँकर 300 फूट खोल दरीत कोसळला. अपघातील जखमींना इगतपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.