जाहिरात

Nashik Accident : कसारा घाटात दुधाचा टँकर खोल दरीत कोसळला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी

Nashik Milk Tanker Accident : नाशिकमधील सिन्नरहून हा दुधाचा टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र नवीन कसारा घाटातील बगलर पॉईंटजवळ टँकरला अपघात झाला.

Nashik Accident : कसारा घाटात दुधाचा टँकर खोल दरीत कोसळला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटाजवळ रविवारी दुधाचा टँकर दरीत कोसळला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.  चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र पावसामुळे मदत आणि बचावकार्यात अडचणी येत होत्या. आपत्ती व्यवस्थापन पथकाने  दोरीच्या साहाय्याने खाली उतरत चार गंभीर जखमींना आणि मृतदेह बाहेर काढले. 

(नक्की वाचा-  भयंकर दुर्दैवी : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच 4 सख्ख्या भावंडांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिन्नरहून हा दुधाचा टँकर मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र नवीन कसारा घाटातील बगलर पॉईंटजवळ टँकरला अपघात झाला. ताबा सुटल्याने टँकर 300 फूट खोल दरीत कोसळला. अपघातील जखमींना इगतपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
पुणेकरांनो, वाजवा रे वाजवा..गणेशभक्तांसाठी सुप्रीम कोर्टानं रद्द केला बंदीचा 'तो' आदेश
Nashik Accident : कसारा घाटात दुधाचा टँकर खोल दरीत कोसळला; 5 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी
Dhule News Municipal employee house was stolen three times
Next Article
एकाच घरात तिसऱ्यांदा चोरी, मनपा कर्मचाऱ्याची रोकड, महागड्या वस्तू आता सोनंही लंपास