MNS Protest : मीरा भाईंदरमध्ये मनसेने पुकारलेला मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर वातावरण चिघळलं आहे. मनसेच्या आंदोलनाच्या दिवशी मंगळवारी पहाटेपासून मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु झालं होतं. मात्र मनसेच्या आंदोलनाबाबत पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? अशी विचारणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. महासंचालक यांना जाब विचारत ही परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का? याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा- MNS Morcha News: 'मराठी'साठी मनसेचा मोर्चा! पोलिसांकडून नेत्यांची धरपकड; मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलं)
मोर्चाच्या आधी CM फडणवीस काय म्हणाले?
त्याआधी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, मोर्च्यासाठी कोणीही परवानगी मागितली की परवानगी दिली जाते, नाकारली जात नाही. रूटच्या संदर्भात चर्चा होती, अशी माहिती मला मिळाली. जाणूनबुजून संघर्ष होईल असे रूट ते मागत होते. नेहमीचा रूट घ्या असं त्यांना सांगण्यात आलं मात्र त्यांनी त्याला नकार दिला. म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची असेल तर ते गैरसमज आहे. योग्य रूट देऊन परवानगी हवी असेल तर देऊ. जो रूट दिला त्यावर जुना मोर्चा निघाला. मात्र यांनी मुद्दाम असा रूट मागितलीय जिथे मोर्चा निघणे कठीण आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.