जाहिरात

Mira Road Accident: मीरा रोडवर हिट अँड रनची घटना; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू

Mira Road Accident: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मीरा रोड येथील ठाकूर मॉलजवळ पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी 'हिट अँड रन'ची घटना घडली आहे.

Mira Road Accident: मीरा रोडवर हिट अँड रनची घटना; कारने तरुणाला फरफटत नेले, जागीच मृत्यू

रमेश शर्मा, मीरा रोड

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ठाकूर मॉलजवळ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, यामध्ये 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.  संतापजनक बाब म्हणजे, चालकाने अपघातग्रस्त तरुणाला महामार्गावर काही अंतरापर्यंत फरपटत नेले आणि त्यानंतर तो वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. 

शरीराचे झाले तुकडे

या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जाकीर मोहम्मद शेख (वय 35 वर्षे) असे आहे. जाकीर हे पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून महामार्गावरून जात असताना ठाकूर मॉलजवळ मागून येणाऱ्या एका अज्ञात अतिवेगवान वाहनाने त्यांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, जाकीर यांच्या शरीराच्या काही भागांचे तुकडे महामार्गावर विखुरले गेले. अपघात झाला हे समजल्यानंतरही अज्ञात वाहनचालकाने गाडी न थांबवता, जाकीर यांना गाडीसोबत रस्त्यावरून फरपटत नेले आणि नंतर अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला.

(नक्की वाचा-  Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)

सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांसमोर आव्हान

घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जाकीर यांचे छिन्नविछिन्न झालेले पार्थिव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. मात्र नॅशनल हायवेवरील ज्या भागात हा भीषण अपघात घडला, तिथे दुर्दैवाने एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे अपघात नेमका कोणत्या वाहनाने केला, त्याचा नंबर काय होता, याचा माग काढणे पोलिसांसाठी अत्यंत जटील बनले आहे. 

काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महामार्गावरील पुढील आणि मागील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com