MNS News : मराठी भाषेवरून मनसे आक्रमक, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी

MNS News : बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेचि मागणी केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन तेथील कामकाज मराठी भाषेत होत आहे की नाही हे तपाण्यास सांगितले होते. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते बँकांमध्ये जात आहेत. 

दरम्यान दोन बँक कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांना जाब विचारत गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  एकीकडे मराठी भाषेवरून मनसे आक्रमक असताना, बँक कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. 

(नक्की वाचा-  Waqf Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर; बाजूने 128, विरोधात 95 मते)

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते मुंबई, ठाणे आणि पुणे येथील राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या व्यवस्थापकांशी संवाद साधत आहेत. मराठीचा वापर व्हावा यासाठी मनसेचे पदाधिकारी बँकेत जाऊन जाब विचारत आहेत. मात्र आता बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षेचि मागणी केली आहे. 

(नक्की वाचा-  Pandharpur News : शहाजीबापू पाटलांनी भर सभेत थोबाडीत मारून घेतली, नेमकं काय घडलं?)

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनची मागणी

  • बँक कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा.
  • स्थानिक पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना बँक कर्मचारी आणि सरकारी मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश द्या.
  • बँक कर्मचाऱ्यांना अशा धमक्यांपासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश एमडी, सीईओ, ईडी आणि झोनल मॅनेजरसह बँक व्यवस्थापनाला द्या.
  • जर त्वरित कारवाई केली गेली नाही, तर संप आणि इतर कायदेशीर उपाययोजनांसह आमचा निषेध वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही.

Topics mentioned in this article