जाहिरात

Raj Thackeray : पुण्याच्या पूरस्थितीवर राज ठाकरेंचा संताप, अजित पवारांना लगावला टोला

गेली 2-3 वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाशी बोलायचे कोणी? प्रसासकीय कारभार सुरू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. 

Raj Thackeray : पुण्याच्या पूरस्थितीवर राज ठाकरेंचा संताप, अजित पवारांना लगावला टोला

पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. पाणी सोडताना इतकं पाणी सोडणार याची लोकांनाही कल्पना नव्हती. बांधकामांमुळे घरांमध्ये पाणी शिरलं. घरांची अत्यंत वाईट स्थिती आहे. शासनाने या गोष्टींचा नीट विचार करणे गरजेचा आहे. कारण या बाधितांना विमाही नाही. पूर्वसूचना न देता पाणी सोडलं असेल आणि लोकांचे नुकसान झाले असेल तर राज्य सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाऊस पडणे हे कोणाच्या हातात नाही. धरणाचे दरवाजे उघडताना लोकांना त्रास होणार नाही याचे कसे नियोजन करता येईल? याचा विचार करायला हवा.  अजित पवार नसतानाही धरण वाहले, इतके पाणी पडले. त्यांनी लक्ष घालायला नको का? असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही हे मी गेली अनेक वर्षे सांगत आहे. कारण प्रत्येक वेळी सरकारकडून विकास आराखडा येतो, मात्र नगर नियोजन नावाची गोष्टच नसते. दिसली जमीन की विक, इतकाच उद्योग सुरू आहे. महापालिका अधिकारी, सरकारी अधिकारी आणि बिल्डर यांच्यातील लागेबांध्यांमुळे ही शहरे बरबाद होत जाणार, अशा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला. 

नक्की वाचा - 'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल

गेली 2-3 वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाशी बोलायचे कोणी? प्रसासकीय कारभार सुरू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. 

मुंबईत जाऊन पुढील निर्णय घेणार

पुनर्विकासाचा प्रश्न असेल तर नागरिकांशी बोला. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना हे फुकट घरे देणार आणि या राज्यात राहणारे लोक घरासाठी भीक मागतायत याला सरकार चालवणे म्हणतात का? प्रत्येकजण आपापल्या राज्याचा विचार करतोय. आपल्या राज्याचा कोणी विचार करणार आहे की नाही? झोपु योजनेत बाहेरच्या राज्यातून बदाबदा लोकं येऊन फुकट घरे घेऊन जात आहेत. कष्टाचे पैसे घालून जे लोकं जमीन, घरे घेतायत ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत. मुंबईला गेल्यानंतर एक बैठक घेईन त्यात पुढील निर्णय घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाचा मोठा गौप्यस्फोट! )

पुण्यात सफाईसाठी बाहेरुन माणसे आणावी लागतात

राज ठाकरे पुढे म्हणाले, मला काल ऐकल्यावर लाज वाटली की पुण्यासारख्या शहरात  साफ सफाईसाठी तुम्हाला पनवेल आणि ठाण्याहून माणसे आणावी लागतात. बाहेरच्या महापालिकांकडे साफसफाईसाठी तुम्हाला लोकं मागावी लागतात. एखाद्या शहरात विविध यंत्रणा काम करत असतात. या सगळ्या सरकारी संस्थांची कधी एकत्र बैठक होते का? टेंडर निघाली की त्यातून पैसे काढता येतात ज्यामुळे चांगले रस्ते, फूटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीयेत. ही सगळी मिलीभगत आहे. 

लोकांना विचारून प्रकल्प का आणत नाही? काळंबेरं असतं का त्यात? विचारायला गेल्यानंतर ते सांगतात की वरून सांगितलंय? वरून म्हणजे कुठून आभाळातून? असे प्रश्न देखील राज ठाकरेंनी विचारले. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर या शहराचा प्रश्न सुटेल. आपण जे बोलतोय ते रॉकेट सायन्स नाही, ती सहज शक्य होणारी गोष्ट आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com