जाहिरात

MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा

जामीन मिळाल्यानंतर मनसे नेते योगेश चिले आणि गजानन काळे हे आणखी आक्रमक झाले आहेत.

MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा
पनवेल:

राहुल कांबळे 

मनसेने नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सुरू असलेल्या डान्सबार विरोधात आक्रमक भूमीका घेतली आहे. पनवेलमधील नाईट रायडर लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये मनसैनिकांनी रविवारी उशिरा रात्री धडक कारवाई करत हल्ला चढवला होता. या हल्ल्यात बारच्या काचा फोडण्यात आल्या. दरवाजांवर लाकडी काठ्यांनी प्रहार करण्यात आला.तसेच बार बंद करण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना आता जामीनही मंजूर झाला आहे. त्यानंतर मनसैनिक आणखी आक्रमक झाले आहेत. 

जामीन मिळाल्यानंतर मनसे नेते  योगेश चिले आणि गजानन काळे हे आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी या पुढच्या काळात नवी मुंबई आणि पनवेलमधील डान्सबार हे बंद झाले पाहीजे अशी भूमीका घेतली. या डान्सबारबाबत आपण नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहोत. त्यांनी हे बार त्वरीत बंद करावेत अशी मागणी करणार आहोत. 15 दिवसात हे डान्सबार बंद व्हावेत अशी आमची मागणी आहे. आम्ही आता 15 दिवसांचा वेळ देत आहोत असं गजानन काळे आणि योगेश चिले यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Panvel MNS News: पनवेलमध्ये मनसेचा रुद्रावतार; ‘नाईट रायडर' बारवर हल्ला, 8 जण पोलिसांच्या ताब्यात

जर या 15 दिवसात हे डान्सबार बंद झाले नाहीत तर मनसे या बार विरोधात धडक कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन त्याला जबाबदार असेल असं ही त्यांनी सांगितलं. सध्या  नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जे डान्सबार सुरू आहेत ते काही राजकारण्यांच्या आशीर्वादामुळे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केले आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तिथे डान्सबार चालतात. अश्लील चाळे केले जातात. पैशांची उधळण होते असा आरोपही होत आहे. त्यामुळे हाबार बंद झालेच पाहीजे असा आग्रह मनसेने केला आहे. 

Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला

दरम्यान पनवेल येथील ऑर्केस्ट्रा आणि बार तोडफोड प्रकरणी मनसे प्रवक्ते योगेश  चिले यांच्यासह 8 जणांना पनवेल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मनसे महानगर प्रवक्ता योगेश चिल्ले, राहुल चव्हाण, संजय मुरकुटे, किरण गुरव, अक्षय हाके यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राजसाहेबांचा विजय असो, बार तोडा, बार फोडा” असे जोरदार घोषणाबाजी बार तोडफोड करताना केली होती. त्यानंतर त्यांनी हातातील दगड बारकडे फेकून काचांचे नुकसान केले होते. दरवाजे आणि बोर्डवर लाकडी काठ्यांनी प्रहार करण्यात आला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com