"खड्डे बुजवले नाही तर त्याच खड्ड्यात उभे करू", मनसे आमदार राजू पाटलांचा KDMC अधिकाऱ्यांना इशारा

आमदार पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त देखील उपस्थित होते .यावेळी खड्डे भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. 

Advertisement
Read Time: 2 mins

कल्याण-डोंबिवलीत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठोपाठ आता मनसे आमदार राजू पाटील देखील आक्रमक झाले आहेत. 

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरले नाहीतर अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करु असा इशारा आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमदार पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त देखील उपस्थित होते .यावेळी खड्डे भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. 

(नक्की वाचा - कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शिवसेना आमदाराचा संताप, केडीएमसी आयुक्तांना इशारा)

मात्र इतक्या वर्षांचा अनुभव पाहता, अधिकाऱ्यांना आंदोलन करुन दट्ट्या दाखवल्याशिवाय काम करता येत नाहीत. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रभागातले खड्ड्यांचे फोटो पाठवण्यास सांगितले आहे. दोन दिवसात खड्डे भरले नाही तर महापालिका अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करू, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

Advertisement

(नक्की वाचा - IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)

शिवसेना आमदाराचाही इशारा

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता. विश्वनाथ भोईर यांनी म्हटलं की, "रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना सूचना केली होती. मात्र प्रशासनाने खड्डे भरले नाही असे दिसत आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे. परंतु आता गणेशोत्सव सुरू झाला आहे. खड्ड्यांमुळे काही घटना घडली. शहरात शांतता आहे ती बिघडेल. घटनेमुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न  निर्माण झाला तर यासाठी केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील." 

Advertisement
Topics mentioned in this article