प्रतीक्षा पारखी, पुणे
पुण्यातील पहिल्याच मोठ्या पावसात पुणेकरांचा तारांबळ झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागली. काही वेळ झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचं रुप आलं होतं. घराबाहेर असलेल्या नागरिकांची देखील या पावसाने धांदल उडाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. ढगाच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. पावसाचा अंदाज नसल्याने नागरिक रेनकोट आणि छत्री न घेताच बाहेर पडले होते. मात्र दीड तासाहून अधित वेळ झालेल्या पावसाने नागरिकांची मोठी अडचण केली.
पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे अवघड बनले होते. अनेक ठिकाणी अनेक दुचाकी पावसामध्ये अडकून पडल्या. पुण्यातील गणेशनगर एरंडवणा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं.
(नक्की वाचा - 'सुजल्यावर कळतंय मारलंय कुठं' कोल्हापुरातल्या राजकीय बॅनरची जोरदार चर्चा)
शिवाजीनगर भागातील टिंबर मार्केट परिसरात देखील रस्त्यावर पाणी साठले. गणेशखिंड रोड परिसरात देखील हीच परिस्थिती होती. जूनच्या सुरुवातीच्या पावसातच जोरदार तडाखा दिल्याने महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे.
(नक्की वाचा - राणे भिडले, गोगावलेंनी ठणकावले, निलेश यांची भाषा बदलली, आता म्हणतात...)
कुठे किती पाऊस झाला? (संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत)
- शिवाजीनगर - 67.4 मिमी
- पाषाण - 56.8 मिमी
- एनडीए - 26.0 मिमी
- इंदापूर - 11.5 मिमी
- गिरीवन - 5.0 मिमी
- हडपसर - 3.0 मिमी
- हवेली - 1.5 मिमी
- लव्हाळे - 1.0 मिमी
- बालेवाडी - 0.5 मिमी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world