जाहिरात

Badlapur News: बदलापुरात डबल मर्डर, ओला चालक अन् महिलेसोबत काय घडलं? लहान मुलाच्या जबाबाने पोलिसही हादरले

बदलापूरच्या जुवेली गाव परिसरात एका महिलेचा आणि ओला चालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दुहेरी हत्याकांड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Badlapur News: बदलापुरात डबल मर्डर, ओला चालक अन् महिलेसोबत काय घडलं? लहान मुलाच्या जबाबाने पोलिसही हादरले
Badlapur Murder News Today

Badlapur Juveli Murder News : बदलापूरच्या जुवेली गाव परिसरात एका महिलेचा आणि ओला चालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना दुहेरी हत्याकांड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मनीषा भोसले आणि ज्योतिबा शिंदे असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हा दुहेरी हत्याकांड झाला त्यावेळी मनीषा यांचा तीन वर्षांचा मुलगा कारमध्येच होता.नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना दिली.त्यानंतर बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. 

पोलिसांच्या माहितीनुसार,मनीषा भोसले या जुवेली गावात राहत होत्या. तर ओला चालक ज्योतिबा शिंदे हे घाटकोपर येथील रहिवासी होते.मनीषा यांच्या पतीचा घाटकोपर येथे चहाच्या व्यवसाय आहे.दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याचं कळते."आईची हत्या चालक काकांनी केली",अंस तीन वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितल्याचं समजते.पण त्यानंतर चालक ज्योतिबा शिंदे याचा मृत्यू नेमका कसा झाला?याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर आली नाहीय. 

नक्की वाचा >> Dhule News धुळेकरांनो सावध व्हा! एका कुटुंबाने आंधळा विश्वास ठेऊन प्लंबरला घरचं काम दिलं, पण त्याची नियत फिरली

हत्येमागचं नेमकं कारण काय?

पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल,घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.ओला चालक ज्योतिबा शिंदे आणि महिला मनीषा भोसले यांच्यात नक्की काय वाद झाले होते? या दोघांमध्ये काय संबंध होते? नक्की हत्येमागेचं कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा >> 'या' तारखेपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, मेट्रो, रेल्वे, बससह इतर वाहतुकीसाठीही फायदेशीर

दुहेरी हत्याकांडच्या अँगलने या प्रकरणाचा तपास सुरु 

या घटनेनंतर उल्हासनगर झोन 4 डीसीपी सचिन गोरे यांनी माहिती दिली की,"घटनेचा तपास सुरू आहे.दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.तांत्रिक दृष्ट्या आणि इतर पुरावांच्या आधारावर आमचा तपास सुरू आहे.दुहेरी हत्याकांडच्या अँगलने या प्रकरणाच्या तपास केला जात आहे .आता ज्या प्रकारे मुलांनी सांगितलं आहे, त्या अँगलने देखील तपास सुरू आहे .दुहेरी हत्याकांड आहे की ओला चालकाने महिलेची हत्या केली? स्वतः आत्महत्या केली? हे पुढच्या तपासात स्पष्ट होईल".

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com