
नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेची पुनरावृत्ती धुळ्यामध्येही घडली आहे. धुळ्यातील प्रमोद नगरात घडलेल्या या घटनेने या परिसरातील सगळ्यांना जबर धक्का बसला आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जातोय असं सांगणारं हसतं खेळतं गिरासे कुटुंब पुन्हा इथल्या लोकांना दिसलंच नाही. मंगळवारपासून या कुटुंबाचे घर बंद होते. कुटुंब प्रमुख प्रवीण गिरासे यांचे धुळ्यामध्ये फर्टिलायझरचे दुकान आहे. प्रवीण गिरासे यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी आली होती. यावेळी घरात सामसूम असल्याचे तिला दिसले होते.
हे ही वाचा : मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे
प्रवीण गिरासे यांच्या घराचे दार उघडेच होते. त्यांची बहीण त्यांना भेटण्यासाठी आली असता त्यांना दिसले की घराच्या दरवाजाला आतून कडी लावण्यात आलेली नव्हती. त्यांनी घरात प्रवेश करताच त्यांना धक्का बसला. प्रवीण गिरासे, त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले ही मृतावस्थेत दिसून आली होती. प्रवीण यांच्या बहिणीने शेजारपाजारच्यांच्या मदतीने पोलिसांना बोलावून घेतली. पोलिसांनी या परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता त्यांना कळाले की, प्रवीण यांनी आपण मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हे कुटुंब दिसलंच नव्हतं.
हे ही वाचा : 'आईवरची शिवी डोक्यात गेली,' ठाण्यातील तरुणानं क्राईम सीरिज पाहिली आणि....
प्रवीण (52 वर्षे) त्यांच्या पत्नी दीपांजली (47 वर्षे), त्यांचा मोठा मुलगा मितेश (19 वर्षे) आणि लहान मुलगा सोहम (14 वर्षे) या चौघांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. या चौघांचे मृतदेह पोस मॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. ज्यातून या चौघांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कळू शकेल.
लेकीला विष पाजून झोपवलं अन् कुटुंबाचाही शेवट!
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमधून (Shocking News from Nashik) हादरवणारी बातमी समोर आली होती. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले होते. यामध्ये आई-वडिलांसह एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता.
विजय माणिक सहाने (38 वर्षे), ज्ञानेश्वरी विजय सहाने (29 वर्षे), अनन्य विजय सहाने (9 वर्षे) अशी या तिघांची नावं आहेत. सहाने कुटुंबीय मूळचे गौळणे गावचे होते. मात्र सध्या ते पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास होते. इंदिरानगर पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास आहे. मुलीला विष देऊन तिच्या आई वडिलांनीही जीवन संपवले. विजय आणि ज्ञानेश्वरी यांनी आधी नऊ वर्षांच्या मुलीला विष पाजलं यानंतर तिला बेडवर झोपवलं. यानंतर दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली असावी असा संशय आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्याच्या एक दिवस आधी हे कुटुंब त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबरला या कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world