
ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर मुंडकं छाटलेला एक मृतदेह आढळला होता. ही घटना उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्या कृतीनं ही हत्या झाली ते समजल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. गुन्ह्याची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सोमवाथ सातगिरी (वय 35) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. पोलिसांनी सोमनाथचा मोबाईल तपासला त्यावेळी त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. त्यानंतर सोमनाथच्या हाताखाली कामाला असलेला लिफ्टमन प्रशांत कदम याने सोमनाथची हत्या केल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी दोन दिवसातच प्रसादच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीनंतर हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
( नक्की वाचा : Telegram : झोलर लोकांचा नवा अड्डा, रोज घातला जातोय कोट्यवधींचा गंडा )
प्रशांतनं सोममाथकडून आठ हजार रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत मागताना त्यानं प्रसादला आईवरुन शिवी दिली. त्यामुळे संतापलेल्या प्रशांतने सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यानं सोशल मीडियावर अनेक क्राईम सीरिज पाहिल्या. हत्या कशी करतात? त्यानंतर कसं पळून जातात? हत्यार कुठं लपवतात? या सर्व गोष्टी प्रसादनं वेब सीरिजमध्ये पाहिल्या होत्या.
प्रशांतनं त्यानंतर सोमनाथला टेरेसवर नेलं. तिथं त्यानं सोमनाथवर अनेक वार केले. सोमनाथ जमिनीवर कोसळताच प्रसादनं त्याचा गळा चिरला आणि त्याचं मुंडकं छाटलं. त्यानंतर तो फरार झाला. ठाणे पोलिसांनी त्याला सांगलीतून अटक केली आहे. त्याला 26 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रशांतनं हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं अजूनही सापडलेली नाहीत. त्याचा शोध कापूरबावडी पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world