Ulhasnagar Murder Case : उल्हासनगरमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या वादातून आईने तिच्या 20 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 च्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. आशा गरड असं अटक केलेल्या आरोपींच नाव आहे. तर अमृता गरड असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे.
अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती, तेव्हाच..
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-1 परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारी अमृता गरड हिचे दुसऱ्या जातीतील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.अमृताच्या या प्रेमप्रकरणाला आई आशाचा विरोध होता.याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आई-मुलीमध्ये जोरदार वाद झाला.त्यावेळी घरात अमृताचे वडील आणि दोन भाऊ झोपलेले होते.वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत असताना,रागाच्या भरात आई आशा गरड हिने दुपट्ट्याने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलं अपात्र, राजकीय वर्तुळात खळबळ
या घटनेत अमृताचा मृत्यू झाला.घटना घडल्यानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 येथे जाऊन पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि आरोपी आई आशा गरडला अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक 1 चे अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world