जाहिरात

Mulund Metro Pillar Collapse: इंजिनिअर्स काय करत होते? महापौरांनी झापले, घटनास्थळावरुनच मोठी घोषणा, VIDEO

Mulund Metro Pillar Collapse : या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिला आहे.

Mulund Metro Pillar Collapse:  इंजिनिअर्स काय करत होते? महापौरांनी झापले, घटनास्थळावरुनच मोठी घोषणा, VIDEO
Mulund Metro Pillar Collapse : मुलुंडमध्ये मेट्रोचा पिलर कोसळून झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय.
मुंबई:

Mulund Metro Pillar Collapse : मुंबईतील मुलुंडमधील मेट्रोचा पूल बांधताना 100 टक्के निष्काळजीपणा झाला असून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिला आहे. मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंटचा भाग चालत्या रिक्षावर कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर महापौरांनी घटनास्थळाला भेट देऊन आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:20 च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.

काय म्हणाल्या महापौर?

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे काम सुरू असताना पिलरची पॅरापीट वॉल निखळून थेट खाली जाणाऱ्या रिक्षावर पडली. ही भिंत कालच बसवण्यात आली होती आणि दुसऱ्याच दिवशी ती कोसळणे हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यांनी घटनास्थळावरील व्हिडिओ आणि फोटोंची पाहणी केल्यानंतर हा कंत्राटदाराचा मोठा हलगर्जीपणा असल्याचे म्हटले आहे. या कामावर देखरेख ठेवणाऱ्या साईट इंजिनियर्सनी आपले कर्तव्य चोख बजावले होते का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांनो सुटका झाली, हिंजवडी मेट्रो धावली! 23 किलोमीटर प्रवासातील सर्व स्टेशन्स कोणती? पहा VIDEO )
 

या प्रकरणात कंत्राटदाराने सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले की नाही, याची सखोल चौकशी केली जाणार आहे. पुलाखालून जाणाऱ्या वाहनांना थांबवणे किंवा योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. महापौरांनी स्थानिक आमदारांकडूनही या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

( नक्की वाचा : Navi Mumbai News: नवी मुंबई विमानतळ परिसरात घर शोधताय? 'हेवी डिपॉझिट'ची ही बातमी वाचल्याशिवाय व्यवहार करू नका! )

मुंबईकरांची सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा विषय असून पायाभूत सुविधांचा विकास करताना नागरिकांचा जीव धोक्यात घालता येणार नाही, असे रितू तावडे यांनी ठामपणे सांगितले. मुंबईकरांची सुरक्षा हे माझे सर्वोच्च प्राधान्य असून या अपघाताला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर आणि संबंधित यंत्रणेवर 100 टक्के कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

इथे पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com