जाहिरात

Iran War: इराणच्या तावडीतून अमेरिकन वैमानिक निसटले! ट्रम्प यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

विमान कोसळल्यानंतर या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली होती.

Iran War: इराणच्या तावडीतून अमेरिकन वैमानिक निसटले! ट्रम्प यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
  • इराणने अमेरिकेचे F-15E लढाऊ विमान पाडले आणि दुसऱ्या वैमानिकाला दोन दिवसांच्या शोधानंतर सुरक्षित बाहेर काढले
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनची पुष्टी केली आहे
  • अमेरिकन सैन्याने आधुनिक विमानांच्या ताफ्यासह इराणच्या सीमेत घुसून कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला बाहेर काढले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

इराणने पाडलेल्या अमेरिकेच्या F-15E लढाऊ विमानातील दुसऱ्या वैमानिकाला दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनची पुष्टी केली आहे. या मोहिमेला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी ऑपरेशन म्हटले आहे. 3 एप्रिल रोजी इराणने हे विमान पाडले होते. ज्यातील एका वैमानिकाला तातडीने वाचवण्यात आले होते, मात्र दुसरा बेपत्ता होता. आता त्याला ही वाचवण्यात आले आहे. शिवाय सुखरूप इराणच्या बाहेर ही काढण्यात आले आहे. याची माहिती स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत या मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले की, हा धाडसी योद्धा इराणच्या दुर्गम पहाडी भागात शत्रूच्या सीमेत अडकला होता. इराणी सैन्य सातत्याने त्याचा पाठलाग करत होते. मात्र अमेरिकन कमांडर्स आणि वॉर सेक्रेटरी 24 तास त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवून होते. अखेर डझनावारी आधुनिक विमानांच्या ताफ्यासह अमेरिकन सैन्याने इराणच्या हद्दीत घुसून आपल्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढले असं ट्रम्प यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Iran US War: इराणचा अमेरिकेला मोठा दणका! 2 फायटर जेट पाडले, अमेरिकन पायलटलाही केलं जेरबंद?

विमान कोसळल्यानंतर या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली होती. इराणने या वैमानिकाची माहिती देणाऱ्याला 60,000 डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. इतकेच नाही तर स्थानिक टोळ्यांनाही या कामात गुंतवले होते. इराणने असा दावाही केला होता की, अमेरिका आपल्याच वैमानिकाला मारण्यासाठी बॉम्बफेक करत आहे. मात्र, अमेरिकेने हा दावा फोल ठरवत ही मोहीम फत्ते केली.

नक्की वाचा - US-Iran War: इराणने पाडलं अमेरिकेचं फायटर जेट; एक वैमानिक बेपत्ता;जिवंत पकडणाऱ्याला इराणकडून बक्षीस जाहीर

28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संघर्षात इराणने पाडलेले हे अमेरिकेचे पहिले मोठे लढाऊ विमान आहे. एका F-15E विमानाची किंमत सुमारे 3.11 कोटी डॉलर्स इतकी आहे. याच दिवशी इराणने कुवैतच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे दुसरे A-10 वॉरथॉग फायटर जेट देखील पाडल्याचे वृत्त आहे. युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्यातल्या त्यात आखाती देश ही यात भरडले गेले आहे. भारताला ही याचा फटका बसला आहे. दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे हे युद्ध कधी संपेल हे आताच सांगणे कठीण आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com