मुलुंडमध्ये हिट अँड रन, BMW कारने दोन गणेशभक्तांना उडवलं, एकाचा मृत्यू

Mulund Accident : गणेशोत्सवाच्या पहिल्याच घडलेल्या या घडनेमुळे 'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका भरधान कारने दोन गणेशभक्तांना उडवलं आहे. यामध्ये आक तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच घडलेल्या या घडनेमुळे 'मुलुंडचा राजा' या गणेश मंडळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलुंडमध्ये पहाटे 4 वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या 2 कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार चालक कार न थांबवून घटनास्थळावरुन पसार झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. 

(नक्की वाचा -  Sindhudurg Accident : गणेशभक्तांच्या बसला अपघात, दोन एसटी बसची समोरासमोर धडक)

प्रसाद पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे, तर प्रीतम थोरात हा तरुण गंभीर जखमी आहे. मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे 4 वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. 

(नक्की वाचा - उल्हासनगरात मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर)

दरम्यान एका बीएमडब्लू कारने कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही. मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला आहे. पोलीस कार आणि कार चालकाचा शोध घेत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article