जाहिरात

Mumbai News: मुंबई विमानतळावर 'महागाई'ला ब्रेक! प्रवाशांची मोठी सोय, चहा, समोसा कितीला? पाहा रेट कार्ड

जर तुम्ही मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरून प्रवास करत असाल, तर चेक-इन एरियामधील गेट 1 आणि 2 च्या मध्ये तुम्हाला हे कॅफे दिसेल.

Mumbai News: मुंबई विमानतळावर 'महागाई'ला ब्रेक! प्रवाशांची मोठी सोय, चहा, समोसा कितीला? पाहा रेट कार्ड
  • मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 मध्ये उडान यात्री कॅफे सुरु करण्यात आला
  • या कॅफेमध्ये चहा, समोसा, वडापाव, स्थानिक स्नॅक्स आणि कॉफी यांसारखे पदार्थ बाजारभावाप्रमाणे उपलब्ध आहेत
  • कॅफेची जागा टर्मिनल 2 च्या चेक-इन एरियामध्ये गेट नंबर 1 आणि 2 च्या दरम्यान आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) महागड्या खाद्यपदार्थांच्या किमतींमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असे. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. केंद्र सरकारच्या 'उडान' मिशन अंतर्गत टर्मिनल 2 (T2) वर 'उडान यात्री कॅफे' सुरू करण्यात आला आहे. येथे अत्यंत स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचे रेटकार्ड ही समोर आले आहे. या आधी एअरपोर्टवर खाण्यासाठी काही घ्यायचे असेल तर खिशाला मोठा चाट पडत असे. पण आता तसे होणार नाही.  

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या पुढाकाराने उडान यात्री कॅफे सुरू करण्यात आले आहेत. ही योजना सर्वसामान्य प्रवाशांसाठी वरदान ठरत आहे. विमानतळावरील महागड्या ब्रँड्सच्या तुलनेत येथे बाजारभावाप्रमाणे दर आकारले जात आहेत. हे कॅफे टर्मिनल 2 च्या चेक-इन एरियामध्ये गेट नंबर 1 आणि 2 च्या दरम्यान स्थित आहे. तिथे जावून तुम्ही स्वत पदार्थांचा आस्वाद घेवू शकला. त्यामुळे या पुढे एअर पोर्टवर जाताना तुम्हाला घरून काही पदार्थ घेवून जाण्याची शक्यता नाही. 

नक्की वाचा - Beed News: 'कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा...', संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंतचा हादरवून सोडणारा खुलासा

किमतींचा तक्ता:

  • चहा: 10 रुपये
  • समोसा: 20 रुपये

या शिवाय या स्टॉलवर वडापाव, स्थानिक स्नॅक्स आणि कॉफी देखील माफक दरात उपलब्ध होणार आहे. स्वस्त दर असले तरी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. स्वच्छता आणि चवीवर विशेष लक्ष दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  या कॅफेचे मेन्यू कार्ड व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. "आता विमान प्रवासापूर्वी घरून पराठे बांधून नेण्याची कटकट संपली," अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही मोठी सोय झाली आहे.

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

जर तुम्ही मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरून प्रवास करत असाल, तर चेक-इन एरियामधील गेट 1 आणि 2 च्या मध्ये तुम्हाला हे कॅफे दिसेल. केवळ स्वस्तच नाही, तर अत्यंत हायजिनिक पद्धतीने येथे पदार्थ तयार केले जातात. वडापावपासून ते कॉफीपर्यंत सर्व काही रस्त्यावरील किमतीत (Street Price) विमानतळावर मिळत असल्याने प्रवाशांची येथे मोठी गर्दी होत आहे. सर्वच विमानतळांवर अशी सोय केली जावी अशी मागणी आता जोर धरू लागत आहे. अनेक वेळा प्रवाशांना तासन तास विमानतळावर ताटकळत राहवे लागते. त्यावेळी या कॅफेचा फायदा होवू शकतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com