VIDEO: भांडुप जंक्शनवर बाईक चालकांना का वाटतेय भीती? जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास

Mumbai News: भांडुप पंम्पिंगजवळ उड्डाणपुलाखाली वाहने संथ गतीने यू-टर्न घेतात. त्याच वेळी अवजड ट्रकमधून ऑइल देखील लीक होते. परिणामी, वळण घेताना दुचाकींचा ताबा सुटतो आणि एकापाठोपाठ एक गाड्या घसरून पडतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विशेषतः दुचाकी चालकांसाठी भांडुप परिसर सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. भांडुप पंपिंग जंक्शन उड्डाणपुलाखालील एका विशिष्ट रस्त्यावर सातत्याने दुचाकी घसरून  अपघात होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केल्या आहेत. कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकांमधून होणारी घाण पाण्याची गळती आणि अवजड वाहनांमधून होणारे ऑइल लिकेज यामुळे हा संपूर्ण रस्ता तेलकट आणि निसरडा झाला आहे. पावसाळा पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच येथील परिस्थिती चिंताजनक बनली असून, प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पावसाळ्यात अपघातांची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कचऱ्याच्या गाड्यांमधील पाणी आणि ऑइल ठरतेय घातक

स्थानिक दुचाकीस्वारांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप पंपिंग जंक्शनजवळ रस्त्यावर नेहमीच एक काळ्या रंगाचा रहस्यमय आणि तेलकट द्रव पसरलेला दिसतो. या परिसरातून जाणाऱ्या पालिकेच्या आणि इतर कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून सडलेले पाणी आणि घाण द्रव खाली रस्त्यावर गळतो. जेव्हा हे पाणी रस्त्यावरील धुळीशी आणि मातीशी मिसळते, तेव्हा तिथे एक अत्यंत निसरडा थर तयार होतो.

Advertisement

(नक्की वाचा: Pune Lohagad Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात)

पाहा VIDEO

यू-टर्न घेताना वाहने घसरतात 

या उड्डाणपुलाखाली वाहने संथ गतीने यू-टर्न घेतात. त्याच वेळी अवजड ट्रकमधून ऑइल देखील लीक होते. परिणामी, वळण घेताना दुचाकींचा ताबा सुटतो आणि एकापाठोपाठ एक गाड्या घसरून पडतात.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)

याबाबत बोलताना एका पोलिसांनी सांगितले की, "हा परिसर दुचाकीस्वारांसाठी धोकादायक बनला आहे. पोलिसांनी सुरक्षेसाठी तिथे बॅरिकेड्स लावले आहेत, परंतु अनेक दुचाकीस्वार स्वतःच्या सोयीसाठी आणि शॉर्टकट घेण्यासाठी हे बॅरिकेड्स बाजूला सारून तिथून वळण घेतात, ज्यामुळे धोका अधिक वाढतो."
 

Topics mentioned in this article