जाहिरात

Crime News: मुंबई हादरली! भरदिवसा 19 वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून बसेल धक्का

Crime News: भरदिवसा तरुणीवर गोळीबार केल्याची घटना घडल्याने मुंबई हादरलीय. नेमकं काय घडलं?

Crime News: मुंबई हादरली! भरदिवसा 19 वर्षांच्या तरुणीची गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून बसेल धक्का
"Mumbai Crime News: भरदिवसा 19 वर्षीय तरुणीची हत्या"
Canva And NDTV Marathi

- ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Crime News: गोवंडी परिसरातील शिवाजीनगरमध्ये मंगळवारी (10 फेब्रुवारी) दुपारी घडलेल्या हत्याकांडमुळे खळबळ उडाली. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 छडा लावलाय. एकाच तरुणावर प्रेम करणाऱ्या दोन तरुणींमधील वादाचा शेवट रक्तपातामध्ये झाला. 19 वर्षीय शिफाचा या लव्ह ट्रँगलमध्ये बळी गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रेयसीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 19 वर्षीय शिफावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवले आणि या गुन्ह्याचा छडा लावला.

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! 24 वर्षांचा तरुण आणि अल्पवयीन मुलगी; त्या प्रेमप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा खुलासा)

संशय, राग आणि हत्या 

या प्रकरणातील मुख्य आरोपी तबस्सूम हिचे नदीम नावाच्या तरुणावर प्रेम होते. पण नदीमचे शिफासोबतही अफेअर असल्याचा संशय तबस्सूमला आला होता. आपला प्रियकर दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्याच्या रागातून तबस्सूमने शिफाचा काटा काढण्याचे ठरवले. या कटात तबस्सूमला काही लोकांनीही साथ दिली. संधी साधून तबस्सूमने शिफाच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. या हत्येसाठी वापरण्यात आलेला देशी कट्टा (रिव्हॉल्वर) पोलिसांनी जप्त केला असून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. तबस्सूम (मुख्य आरोपी प्रेयसी),  नदीम (ज्याच्यावरून वाद झाला तो प्रियकर), साजिद (तबस्सूमचा भाऊ) आणि कलाम (साजिदचा मित्र) अशी अटक केलेल्या लोकांची नावं आहेत. 

(नक्की वाचा: Gauri Garje Suicide Case: 'ती' व्हॉइस क्लिप अन् डॉ गौरी गर्जेचा शेवट; पती अनंतनं रचलेलं भयानक षडयंत्र उघड)

हत्या केल्यानंतर आरोपी पसार होण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. मुलगा एक आणि प्रेयसी दोन, या वादातून एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com