जाहिरात

Viral Video: संतापजनक! महिलांच्या डब्यात शिरुन दादागिरी, महिलेला ढकललं अन्...मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना

Viral Video: मुंबई लोकलच्या महिला डब्यात वांद्रे स्टेशनवर एक पुरुष जबरदस्तीने घुसल्याचा धक्कादायक व्हिडीओ तुलिका जैन नावाच्या महिलेने शेअर केला आहे. संकटसमयी रेल्वेची हेल्पलाइन आणि टॉकबॅक सिस्टीम बंद असल्याने महिला सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे.

Viral Video: संतापजनक! महिलांच्या डब्यात शिरुन दादागिरी, महिलेला ढकललं अन्...मुंबई लोकलमधील धक्कादायक घटना
"Viral Video: मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यातील धक्कादायक घटना समोर"
Tulika Jain Instagram

Viral Video: मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे (Bandra) स्टेशनवर एका पुरुषाने लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश करत प्रवाशांशी अत्यंत उद्धट आणि हिंसक वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुलिका जैन नावाच्या महिला प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या घटनेचा संतापजनक व्हिडीओ आणि माहिती शेअर केली असून रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

डब्यात घुसून दादागिरी, प्रवाशांच्या विरोधानंतरही हेकेखोरपणा

मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेन वांद्रे स्टेशनवर पोहोचल्यानंतर एका पुरुषाने जबरदस्तीने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवेश केला. डब्यातील महिला प्रवाशांनी त्याला तत्काळ खाली उतरण्यास सांगितले. तसेच शेजारच्या जनरल डब्यातील पुरुष प्रवाशांनीही त्याला ओरडून बाहेर जाण्यास बजावले. पण तो माणूस खाली उतरण्यास तयार नव्हता. उलट तो अधिकच आक्रमक झाला आणि महिलांसोबत मोठ्या आवाजात हुज्जत घालत उद्धटपणे वागू लागला.

संकटसमयी हेल्पलाइन आणि आपत्कालीन टॉकबॅक बॉक्स दोन्ही बंद!

या धक्कादायक प्रकारामुळे डब्यातील महिला प्रचंड घाबरल्या होत्या. त्यांनी मदतीसाठी रेल्वेच्या 1512 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर महिलांनी डब्यात बसवण्यात आलेल्या आपत्कालीन टॉकबॅक बॉक्स (Emergency Talkback Box) वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती यंत्रणाही पूर्णपणे बंद आणि निकामी असल्याचे आढळून आले. रेल्वे प्रशासनाचे हे पद्धतशीर अपयश महिलांच्या जीवावर बेतू शकले असते, असा संताप महिलांनी व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा : Pune Metro Viral Video: खिडक्या बंद, दरवाजे बंद; तरीही पुणे मेट्रोच्या आत कसं काय साचलं पाणी? धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद)

किंग्ज सर्कल स्टेशनवर महिला प्रवाशाला ढकलून नराधम फरार

ट्रेन जेव्हा किंग्ज सर्कल (King's Circle) स्टेशनवर पोहोचली, तेव्हा या पुरुषाचे वर्तन अधिकच हिंसक झाले. तिथून पळ काढण्यासाठी त्याने डब्यातील एका महिला प्रवाशाला अत्यंत जोरात ढकलले.

मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ

महिला प्रवाशाचा मुंबई पोलिसांना सवाल

"हा प्रकार अतिशय भयानक आणि धोकादायक आहे. यावेळी डब्यात महिलांची गर्दी होती म्हणून ठीक, पण फक्त दोन किंवा तीनच महिला असत्या तर काय झाले असते? सुरक्षा उपायांचे हे अपयश उद्या एखाद्या मोठ्या गंभीर गुन्ह्यासाठी कारणीभूत ठरू शकते. मुंबई पोलीस कृपया यावर तत्काळ लक्ष द्या आणि कारवाई करा," अशी मागणी तुलिका जैन यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली आहे.

(नक्की वाचा: स्वस्त तेलाची भारतात पुन्हा एण्ट्री, राष्ट्राध्यक्ष मोठा करार करणार असल्याची चर्चा; पण अमेरिका का देतंय अपडेट?)

या व्हायरल व्हिडीओनंतर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून त्या विकृत पुरुषाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com