Mumbai Metro: गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ; भक्तांसाठी मेट्रोच्या अधिक फेऱ्या

Mumbai Metro : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारसाठी अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumabi News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 च्या सेवांच्या वेळेत वाढ केली आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत मेट्रो आता रात्री मध्यरात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे, असे एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोने जाहीर केले आहे. गणेशोत्सवाचा आनंद भाविकांना साजरा करता यावा यासाठीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 10 दिवसांच्या उत्सवासाठी लागू राहील.

वेळेत वाढ

अंधेरी पश्चिम (लाईन 2A) आणि गुंदवली (लाईन 7) या दोन्ही ठिकाणांहून शेवटची गाडी रात्री 12 वाजता सुटेल. याआधी ही सेवा रात्री 11 वाजता बंद होत होती.

(नक्की वाचा-  Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?)

अतिरिक्त फेऱ्या

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार तसेच शनिवार आणि रविवारसाठी अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोमवार ते शुक्रवार 317 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त). गर्दीच्या वेळी दर 5.50 मिनिटांनी एक गाडी मिळेल. शनिवारी 256 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. गर्दीच्या वेळी दर 8.06 मिनिटांनी एक गाडी उपलब्ध असेल. तर रविवारी 229 फेऱ्या (आधीपेक्षा 12 फेऱ्या जास्त) असतील. या दिवशी दर 10 मिनिटांनी एक गाडी धावेल, आणि गरज पडल्यास अतिरिक्त फेऱ्यांचीही सोय केली जाईल.

(नक्की वाचा - Nashik Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार, घरी एकटी असताना नको ते केलं; अल्पवयीन मुलगी गर्भवती)

मेट्रोची सध्याची स्थिती

सध्या, मुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आठवड्याच्या दिवसांमध्ये 317 सेवा चालवते. यात गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटे 50 सेकंदांनी आणि कमी गर्दीच्या वेळी 9 मिनिटे 30 सेकंदांनी मेट्रो उपलब्ध असते. वीकेंडला 256 सेवा चालवल्या जातात. त्यात गर्दीच्या वेळी 8 मिनिटे 6 सेकंद आणि कमी गर्दीच्या वेळी 10 मिनिटे 25 सेकंदांनी मेट्रो धावते.

Advertisement

Topics mentioned in this article