Mumbai Metro : मुंबई मेट्रोचा विक्रम; एकाच दिवसात 3.25 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 18 जून 2025पासून आतापर्यंत मेट्रोच्या प्रवासी संख्येचा विक्रम 11 वेळा मोडला गेला आहे. यावरून मुंबईकर मेट्रोला किती मोठ्या प्रमाणावर स्वीकारत आहेत, हे दिसून येते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गांवर 12 ऑगस्ट 2025 रोजी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवण्यात आली आहे. या एकाच दिवसात 3,25,652 प्रवाशांनी प्रवास करत मेट्रोने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 'महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड'ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोने 12 ऑगस्ट 2025 रोजी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या दिवशी मेट्रोच्या 2A आणि 7 या मार्गांवर तब्बल 3,25,652 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

एका महिन्यात 11 वेळा मोडला रेकॉर्ड

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 18 जून 2025पासून आतापर्यंत मेट्रोच्या प्रवासी संख्येचा विक्रम 11 वेळा मोडला गेला आहे. यावरून मुंबईकर मेट्रोला किती मोठ्या प्रमाणावर स्वीकारत आहेत, हे दिसून येते. केवळ एका महिन्यात मेट्रोच्या दैनिक प्रवासी संख्येत 8.14 टक्के वाढ झाली आहे. मुंबईकरांच्या वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि विश्वासार्हतेमुळे मेट्रोला अधिक पसंती मिळत आहे.

(नक्की वाचा- Pune Metro: पुणे मेट्रोचा डेली पास कुठे आणि कसा मिळेल? किती पैसे लागतील)

महा मुंबई मेट्रोने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी संख्येतील ही वाढ स्पष्टपणे दिसून येते आहे.

  • 8 जुलै 2025 - 3,01,129 प्रवासी
  • 16 जुलै 2025 - 3,12,371 प्रवासी
  • 1 ऑगस्ट 2025 - 3,21,192 प्रवासी
  • 12 ऑगस्ट 2025 - 3,25,652 प्रवासी (विक्रमी)

महा मुंबई मेट्रोने त्यांच्या सर्व प्रवाशांचे आभार मानले आहेत, कारण त्यांच्या सहभागामुळेच हे सर्व विक्रम शक्य झाले आहेत. मुंबईकरांचा असाच पाठिंबा मिळत राहिल्यास, भविष्यात ही प्रवासी संख्या आणखी वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article