जाहिरात

Mono Rail Accident: मोनो रेलचा अपघात नेमका कशामुळे झाला ? प्रशासनाची गोलगोल उत्तरे

Mono Rail Accident: मोनो रेलचे संचालन महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केले जाते. त्यांनी म्हटले आहे की, आधुनिक यंत्रणा चाचणी सुरू असून, ही चाचणी संवाद आधारीत ट्रेन नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होती.

Mono Rail Accident: मोनो रेलचा अपघात नेमका कशामुळे झाला ?  प्रशासनाची गोलगोल उत्तरे
मुंबई:

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पांढरा हत्ती ठरलेल्या मोनो रेलला बुधवारी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी पुन्हा एक अपघात झाला. 19 ऑगस्ट  आणि 15  सप्टेंबर रोजी मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. मोनो ही एलेव्हेटेड म्हणजेच उन्नत मार्गावरून धावत असल्याने मोनोत अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली होती. या दोन घटनांनंतर मोनोची सेवा 20 सप्टेंबरपासून तांत्रिक सुधारणेच्या कामासाठी स्थगित करण्यात आली होती. मोनो सेवा सुधारण्यासाठी नव्या गाड्या रुळावर उतरवण्यात आल्या होत्या, त्यापैकी एका गाडीला बुधवारी अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल मोनो रेल प्रशासनाने मौन बाळगले आहे.  

नक्की वाचा: अ‍ॅक्वा मेट्रो लाईनमुळे बेस्टचे प्रवासी घटणार? बेस्ट प्रशासनाकडून सखोल अभ्यास सुरू

मोनो रेलचा अपघात कसा झाला?

बुधवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी मोनोरेलला झालेल्या अपघाताचे जे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत ते पाहाता मोनो रेल रुळावरून उतरलेली स्पष्टपणे दिसते आहे. रुळावरून उतरलेली मोनो दोन ट्रॅकच्या फटीत अडकल्याचेही दिसून येत आहे.

Latest and Breaking News on NDTV

मोनोची चाचणी सुरू असताना नियंत्रण कक्षातून कोणीतरी मार्ग बदलाचा स्विच दाबला, ज्या ठिकाणी मार्ग बदलाचा सांधा आहे, त्याच ठिकाणी मोनो रेल होती. अचानक मार्ग बदल झाल्याने मोनो रूळावरून उतरली असावी अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात याबद्दल कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

नक्की वाचा: बाईकवरून जाणाऱ्या समोर पोलिसांनी हात जोडले; बाईकवर एवढेजण पाहून पोलिसाही थबकले

मोनो रेल प्रशासनाचे अपघातबद्दल काय म्हणणे आहे ?

मोनो रेलचे संचालन महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केले जाते. त्यांनी म्हटले आहे की, आधुनिक यंत्रणा चाचणी  सुरू असून, ही चाचणी संवाद आधारीत ट्रेन नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होती. मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत ही चाचणी सुरू होती. ही चाचणी अत्यंत वाईट किंवा खडतर परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जात होती. त्यामुळे ही घटना नियमित चाचणी प्रक्रियेचा भाग आहे.  मोनोरेलमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे सप्टेंबर 20 पासून मोनोरेलची प्रवासी सेवा स्थगित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तांत्रिक बिघाडांच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. ही अंतर्गत चाचणी यशस्वी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशी देखील काम सुरू आहे, जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com