Mumbai News: मुंबईच्या सर्व शाळांमध्ये आता मनाचे श्लोक सक्तीचे? माजी महापौरांच्या प्रस्तावामुळे नवा वाद पेटला

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. नवा वाद पेटला, 9 एप्रिलला होणाऱ्या सभेत काय होणार? सविस्तर वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai News: मुंबईच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक घुमणार?

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता समर्थ रामदास स्वामी रचित 'मनाचे श्लोक' सक्तीचे करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडलेल्या या प्रस्तावामुळे शैक्षणिक वर्तुळात आणि राजकीय पटलावर नवी चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रस्तावामागची भूमिका आणि दावा 

किशोरी पेडणेकर यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत आहे. 'मनाचे श्लोक' केवळ धार्मिक नसून ते मानसिक आणि नैतिक विकासाचे प्रभावी साधन आहेत. मनाचे श्लोकचे नियमित पठण केल्यास आत्मपरिक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणास मदत होईल. 

Advertisement

राजकीय विरोध आणि संविधान शिक्षणाची मागणी

हा प्रस्ताव समोर येताच एमआयएम (MIM) पक्षाने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी आक्षेप घेत म्हटले आहे की, "शाळांमध्ये धर्माच्या आधारे नव्हे तर संविधानाचे शिक्षण द्यावे. सर्वधर्मीय विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये."   

(नक्की वाचा: LPG Vs PNG: मुंबईकरांनो सावधान! 3 महिन्यात LGP कनेक्शन कापणार? सायन, लोअर परळसारख्या भागातील धक्कादायक वास्तव)

खासगी शाळांमध्येही लागू होणार नियम 

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तो पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवला जाईल. विशेष म्हणजे हा नियम केवळ पालिका शाळांपुरता मर्यादित न ठेवता, ज्या खासगी शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य आहे, तिथेही लागू करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे समजते.

(नक्की वाचा: Pune News: पुणेकरांचे बजेट कोलमडणार! CNGच्या दरात आजपासून वाढ, पाहा नव्या किंमती, दरवाढीचं काय आहे कारण?)

योग सक्तीचा प्रस्ताव फेटाळला होता

यापूर्वी भाजपच्या माजी नगरसेविका समिता कांबळे यांनी शाळांमध्ये योग सक्तीचा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, मात्र प्रशासनाने तो फेटाळून लावला होता. त्यामुळे आता 'मनाचे श्लोक' या प्रस्तावाबाबत प्रशासन काय भूमिका घेते आणि 9 एप्रिलच्या सभेत सत्ताधारी व विरोधी पक्ष आमनेसामने कसे भिडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.