जाहिरात

Mumbai News : शाळेच्या बसवर भलंमोठं झाड कोसळलं, बसचा चेंदामेंदा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू; 10 गंभीर जखमी

चेंबूर येथील ११ नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News : शाळेच्या बसवर भलंमोठं झाड कोसळलं, बसचा चेंदामेंदा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू; 10 गंभीर जखमी

Mumbai News : मुंबईतील चेंबूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर येथील ११ नंबर रोडवर एका शाळेच्या बसवर पिंपळाचं भलंमोठं झाड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये शाळकरी मुलं प्रवास करीत होती. या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून १० मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.  याशिवाय एक मुलगा बराच काळ बसमध्ये अडकून पडला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, या झाडाबाबत स्थानिकांकडून यापूर्वीही तक्रार करण्यात आली होती. रस्त्याच्या शेजारील भलंमोठं झाड अचानक बसवर कोसळलं. या बसमध्ये युनिव्हर्सल शाळेची मुलं असल्याची माहिती आहे. बसचे काही फोटो समोर आले आहेत. भलंमोठं झाड कोसळल्याने या बसचा अक्षरश: चुराडा झाला आहे. 

चेंबूरमधील रोड क्रमांक ११ वर घडलेल्या या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आणि बीएमसीचे (BMC) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचावकार्य सुरू केले. त्या विद्यार्थ्याला बसमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. झाड पडण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com