जाहिरात

Famous Kirti Vada Pav Closed : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आवडता वडापाव बंद

व्यावसायिक सिलिंडर विक्री विस्कळीत झाल्याने अनेक दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे.

Famous Kirti Vada Pav Closed :  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आवडता वडापाव बंद

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : व्यावसायिक सिलिंडर विक्री विस्कळीत झाल्याने अनेक दुकानं बंद करण्याची वेळ आली आहे. मुंबई-पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलांमधील मेन्यूतील कित्येक पदार्थ बेदखल झाले आहेत. मुंबईकरांची भूक भागवणारा स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वडापाववर गॅस तुटवड्यामुळे संक्रात ओढवली आहे. मुंबईतील प्रसिद्ध कीर्ती वडापाव बंद करावं लागलं आहे. येथील वडापाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही प्रचंड आवडतो. विशेषत: येथून चुरा पाव खवय्यांचा आवडता आहे.  

युद्धाची झळ मुंबईतील फेमस कीर्ती वडापावला

गेल्या 6 दिवसांपासून कीर्तीचा वडापाव म्हणून प्रसिद्ध असलेलं अशोक वडापाव सेंटर बंद करावं लागलं आहे. LPG नसल्याने दुकान बंद करायची वेळ आल्याने अशोक वडापाव सेंटरचे मालक अशोक ठाकूर भावुक झाले आहेत. कीर्ती कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह अनेकांसाठी कीर्ती वडा पाव पोट भरण्याचं ठिकाण. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद असल्याने खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

नक्की वाचा - Mumbai News : 'तू जीव दे, नाहीतर..'; मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला धमकी, प्रशिक्षण केंद्रात उचललं टोकाचं पाऊल

शासनाने यात मार्ग काढून आम्हालाही सिलिंडर द्यावे अशी मागणी ठाकूर यांच्याकडून करण्यात आली आहे. खवय्ये दुकानावर घेऊन परत जात आहेत. तर मुंबईतील इतर ठिकाणच्या वडापावचे दरही दणाणले आहेत. 15-20 रुपयांत मिळणारा वडापाव आता 30 रुपयांना झाला आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com