Mumbai Rains Nowcast Warning: मुंबई, पालघरला हवामान खात्याचा पावसाचा 'रेड' अलर्ट, पुढचे 3 तास महत्त्वाचे

Mumbai News: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी बुधवारी (२४ जून) सकाळी 'रेड नाऊकास्ट' (Red Nowcast) इशारा जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईकरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून अखेर मंगळवारी मुंबईत नैऋत्य मोसमी पाऊस अधिकृतपणे दाखल झाला आहे. पावसाचे आगमन होताच भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मुंबई प्रादेशिक केंद्राने बुधवारी (24 जून) सकाळी मुंबई आणि शेजारील पालघर जिल्ह्यासाठी 'रेड नाऊकास्ट' इशारा जारी केली आहे. आगामी 3 तासांत या भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

Advertisement

वाहतूक आणि रेल्वे सेवा पूर्ववत, रस्त्यांवर मात्र कोंडी

मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील पावसानंतरही मुंबईतील सर्व प्रमुख सबवे खुले असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे सेवा काहीशी उशीराने आणि 'बेस्ट' बस सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय धावत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने आणि पावसाच्या संततधारेमुळे मुंबईतील काही प्रमुख महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर मात्र वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

(नक्की वाचा-  Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?

मुंबईत कुठे किती पाऊस? 

महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

  • नायर हॉस्पिटल (सेंट्रल मुंबई)- 78.96 मिमी (सर्वाधिक)
  • एन. एम. जोशी मार्ग (लोअर परळ) - 78.4 मिमी 
  • परळ टीटी-  72.63 मिमी 
  • मालाड बस डेपो (पश्चिम उपनगर) - 61.8 मिमी 
  • महाराष्ट्रनगर, मानखुर्द (पूर्व उपनगर)-  51.2 मिमी 


 

Topics mentioned in this article