जाहिरात

Mumbai Police : मुंबईच्या 19 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, मॅटकडून पोलीस आयुक्तांना नोटीस! कारण काय?

Mumbai Police : मुंबईच्या 19 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या, मॅटकडून पोलीस आयुक्तांना नोटीस! कारण काय?
मुंबई:

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली केल्याविरोधात एका अधिका-यानं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाद मागितली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पोलीस मंडळानं 17 मे 2025 रोजी मुंबईतील 19 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश तडकाफडकी जारी केलेत. हे आदेश जारी करताना संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली होती का? याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं (मॅट) मुंबई पोलीस आयुक्तांना जारी केलेत. 

याविरोधात कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी ॲड. प्रशांत नागरगोजे यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात म्हणजेच मॅटमध्ये याचिका दाखल केली आहे. 

हे बदली आदेश राजकीय दबावाखाली झाल्याचा थेट आरोप करत हे आदेश रद्द करावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. ही याचिका सादर होताच जागं झालेल्या पोलीस प्रशासनानं उशिरानं का होईना, पण अनिल पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांनी बाजू मांडण्यासाठी नोटीस जारी केली आहे.

( नक्की वाचा : Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं? )
 

मॅटकडून मुंबई पोलीस आयुक्तांनाही नोटीस जारी- मॅट सदस्य देबाशीष चक्रवर्ती यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान केलेल्या बदल्या या नियमानुसारच करण्यात आल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला. 

मात्र या बदल्या करताना नियमांचं पालन झालेले नाही, असं प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे, असं मत मॅटनं नोंदवलं आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्याची मुदतीपूर्वी बदली करण्यापूर्वी चौकशी होणं आवश्यक असून, संबंधित अधिकाऱ्याची बाजूही ऐकून घेणं आवश्यक आहे.

 राज्याच्या पोलीस महासंचालकांचं तसं परिपत्रकच आहे. त्यामुळे या बदल्यांमध्ये हा नियम पाळला गेलाय का? अशी विचारणा मॅटनं मुंबई पोलीस आयुक्तांकडे करत या प्रकरणाची सुनावणी 17 जूनपर्यंत तहकूब केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com