जाहिरात

Mumbai News: भांडुपमधील 'या' परिसरात स्थानिकांचा आक्रोश, एका घटनेमुळं वातावरण चिघळलं, पोलिसांची धडक कारवाई

शक्तीधाम मंदिरासमोरील रस्त्याने भांडुप स्टेशनकडे जात असताना एका 60 वर्षीय व्यक्तीला भाजी विक्रेत्यांनी शिविगाळ केली.राजेंद्रप्रसाद हनुमान सिंग असं या व्यक्तीचं नाव असून ते ड्रीम्स कॉम्प्लेक्समध्ये राहतात.

Mumbai News: भांडुपमधील 'या' परिसरात स्थानिकांचा आक्रोश, एका घटनेमुळं वातावरण चिघळलं, पोलिसांची धडक कारवाई
Bhandup Dreams Complex Hawkers Issue

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Bhandup Crime News Today :  शक्तीधाम मंदिरासमोरील रस्त्याने भांडुप स्टेशनकडे जात असताना एका 60 वर्षीय व्यक्तीला भाजी विक्रेत्यांनी शिविगाळ केली.राजेंद्रप्रसाद हनुमान सिंग असं या व्यक्तीचं नाव असून ते ड्रीम्स कॉम्प्लेक्समध्ये राहतात.सिंग यांनी भाजी विक्रेत्यांना याबाबत जाब विचारला आणि त्यांच्यातील वाद वाढला.त्यानंतर फेरीवाल्यांनी सिंग यांना मारहाण केली,असा आरोप करण्यात आला आहे.तसच लाकडी वस्तूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं गेलंय. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अब्बास मुर्तजा शेख,मोहसीन शेख आणि शमशुद्दीन शेख अशी आरोपींची नावे आहेत. 

लाकडी वस्तूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी

ड्रीम्स कॉम्प्लेक्समध्ये राहणारे 60 वर्षीय राजेंद्रप्रसाद हनुमान सिंग यांनी भांडुप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार,शक्तीधाम मंदिरासमोरील रस्त्याने भांडुप स्टेशनकडे जात असताना त्यावेळी तेथे बसलेल्या काही भाजी विक्रेत्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सिंह यांनी याबाबत जाब विचारताच वाद वाढला आणि त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांना थेट मारहाण केली. लाकडी वस्तूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> KDMC News : महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या महिला गटनेत्या भडकल्या, सिद्धार्थ जाधव यांच्या भेटीमुळं काय घडलं?

फेरीवाल्यांच्या दुकानांवर तोडक कारवाई

या प्रकरणात अब्बास मुर्तजा शेख,मोहसीन शेख आणि शमशुद्दीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली असून आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या घटनेची गांभीर्याने दखल घेत  पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधित फेरीवाल्यांच्या दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली.

नक्की वाचा >> Pune News: आषाढी पालखी सोहळ्यासाठी पुण्यात खलबतं, वारकऱ्यांना काय-काय सुविधा मिळणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या..

पोलिसांच्या उपस्थितीत ड्रीम्स कॉम्प्लेक्समधील रहिवासीही मोठ्या संख्येने एकत्र आले होते.रहिवाशांनी फेरीवाल्यांविरोधात विविध तक्रारी मांडत परिसरातील अतिक्रमण, वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षेचे प्रश्न उपस्थित केले.तसेच मारहाणीच्या घटनेतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com